Children Health esakal
आरोग्य

Children Health : मुले सतत अंगठा चोखतात? 'या' शब्दांच्या उच्चारणात निर्माण होऊ शकतो दोष

Children Health : लहान मुलांमध्ये काही सवयी लहान वयात सामान्य विकासाचा भाग म्हणूनच दिसतात. ज्या तात्पुरत्या असून वेळेसोबत नाहीशा होतात.

सकाळ वृत्तसेवा

Children Health : लहान मुलांमध्ये काही सवयी लहान वयात सामान्य विकासाचा भाग म्हणूनच दिसतात. ज्या तात्पुरत्या असून वेळेसोबत नाहीशा होतात. जर या सवयी सुरूच राहिल्या तर मुख व दातांचे आरोग्य बिघडू शकते. जसे अंगठा चोखण्याची सवय असल्यास र, त, द शब्दांचा उच्चार बिघडतील, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील बाल दंत रोगशास्त्र विभागातून पुढे आली.

तीन वर्षांनंतरही बाळाचे अंगठा चोखणे सुरूच असेल तर त्याच्या दातांवर परिणाम होतो. दात पुढे येण्याचा मोठा धोका असतो. दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येताना दातासह हनुवटीचा आकार बिघडण्याची शक्यता असते. लांना अशा चुकीच्या सवयी सोडविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावे, असे डॉ. रितेश कळसकर म्हणाले.

मुलांच्या या सवयी घातक :

  • अंगठा चोखणे

  • दातांनी नाख तोडणे

  • सतत ओठ चावणे

  • तोंडाने श्वास घेणे

विविध सवयीचे दुष्पपरिणाम :

  • बोलताना जीभ बाहेर काढण्याचे प्रकार दिसतात.

  • काही शब्द तोंडातल्या तोंडात बोलत असल्याचे दिसून येते.

  • तोंडाच्या आसपासच्या ऊतींना मोठी हानी पोहोचते.

  • जीभ दाबल्याने तोंड कोरडे होऊ शकते.

  • श्वासाची दुर्गंधी होणे.

  • दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होणे.

चुकीच्या तोंडी सवयीचा मुखावरच नाही, तर आरोग्यावरच नाही तर दिसण्यावर देखील परिणाम होतो. पुढे त्यांच्या मानसिकतेवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अश्या तोंडी सवईच्या उपचारासाठी पालकांच्या सहकार्याची व मुलांच्या योग्य समुपदेशनाची गरज असते.

बऱ्याचदा या सवयी मागचे कारण हे मुलांमध्ये असलेली भीती किंवा तणाव असू शकते. यासाठी दंत वैद्यक यांच्याकडून उपचार घेणे गरजेचे आहे. विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे जसे दातांना पिन लावणे, मुलांना मार्गदर्शन करणे अशा सहाय्यातून दंत वैद्यक निश्चितच या सवयी सोडवण्यासाठी मदत करत असतात.

(-डॉ. रितेश कळसकर, विभागप्रमुख, बाल दंतरोग विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT