Piles Cancer google
आरोग्य

Piles Cancer : गुदद्वारातून रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच नव्हे; कर्करोगही असू शकतो

आतड्याचा आणि गुदाशयाचा कर्करोग असो की मूळव्याध, दोन्ही आजारांमध्ये गुदद्वाराच्या आत गाठ जाणवते.

नमिता धुरी

मुंबई : गुदद्वारात गुठळ्या होणे आणि पोट साफ करताना रक्त येणे ही मूळव्याधाची सामान्य लक्षणे आहेत. पण कोलोरेक्टल कॅन्सरचेही लक्षण ठरू शकते.

मोठ्या आतड्यातून किंवा गुदद्वारातून विकसित होणाऱ्या कर्करोगाच्या आजाराला कोलोरेक्टल कर्करोग असे म्हणतात.

कोलोरेक्टल कॅन्सर की मूळव्याध ?

कोलोरेक्टल कॅन्सर आणि मूळव्याध मध्ये अनेक समान लक्षणे आहेत. त्यामुळे बहुतेक लोक या कर्करोगाला सुरुवातीला मूळव्याध समजतात आणि समस्या गंभीर बनते. (Colorectal Cancer symptoms piles symptoms) हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

गुदद्वाराच्या आत ढेकूळ

आतड्याचा आणि गुदाशयाचा कर्करोग असो की मूळव्याध, दोन्ही आजारांमध्ये गुदद्वाराच्या आत गाठ जाणवते. खाज आणि वेदना देखील होतात.

रक्ताचा रंग समान असणे

मूळव्याध आणि गुदाशयाचा कर्करोग गुदद्वाराच्या टोकाला सुरू होतो. दोन्ही समस्यांमध्ये, आतड्याच्या हालचाली दरम्यान किंवा नंतर रक्तस्राव होतो.

दोन्ही कारणांमुळे हलका लाल रक्तस्राव होतो. जर कॅन्सर मोठ्या आतड्याच्या आत झाला असेल तर त्याचा रंग गडद लाल असू शकतो.

पोटदुखीची वेगवेगळी लक्षणे असतात

जर सतत पोट फुगणे, पोटदुखी, पेटके इत्यादींसोबत रक्तस्राव होत असेल तर ते कोलोरेक्टल कर्करोगाचे योग्य निदान होऊ शकते. मूळव्याधांमध्ये या समस्यांचा धोका नगण्य असतो. मूळव्याधची लक्षणे येतात आणि जातात, परंतु या कर्करोगाची लक्षणे कायम राहतात.

अचानक वजन कमी होणे

मूळव्याधात वजन कमी तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलता. पण गुदाशय आणि आतड्याच्या कर्करोगात आहार पूर्वीसारखाच असतानाही अचानक वजन कमी होते आणि तुम्ही अशक्त होता.

डॉक्टरकडे कधी जायचे ?

पोट साफ करताना रक्तस्राव, वेदना हे मूळव्याधचे सामान्य लक्षण आहे. पण, त्यामागील कारण काहीही असो, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे मूळव्याध किंवा कर्करोग गंभीर होत असल्यास वेळीच उपचार घेता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT