Can High BP and Diabetes Affect Kidney Health sakal
आरोग्य

Diabetes, Hypertension & Kidneys: किडनी निरोगी ठेवण्यासाठी मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण आवश्यक – डॉ. समीर चौबे

Role of Sugar and Blood Pressure in Kidney Failure: किडनी निरोगी राहावी यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत.

सकाळ वृत्तसेवा

Managing Diabetes and Blood Pressure is Crucial for Maintaining Healthy Kidneys: धकाधकीच्या जीवनशैलीत मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन प्रमुख जीवनशैलीजन्य आजार चटकन शरीरात घर करू लागले आहेत. दोन्ही स्थिती मूत्रपिंडांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे वेळेवर रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच भविष्यातील डायलिसिस किंवा प्रत्यारोपण टाळण्याचा उपाय ठरतो, असा सल्ला प्रसिद्ध नेफ्रोलॉजीस्ट डॉ. समीर चौबे यांनी दिला.

रामदासपेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित ''कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात एशियन किडनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध किडणी रोगतज्ज्ञ डॉ. समीर चौबे बोलत होते. त्यांनी सांगितले की, मधूमेह, उच्च रक्तदाब किडनी फेलियरचे प्रमुख कारण आहे. तरुणाईमध्ये वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण, जास्त प्रमाणात पेन किलर सारख्या औषधांचे सेवन, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार हे देखील किडनी खराब होण्यासाठी महत्त्वाच्या बाबी ठरतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने कुठलाही औषधोपचार घेऊ नये.

किडनी प्रत्यारोपण सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले. परंतु, आजही किडनीसह विविध अवयवांची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या तुलनेत अवयव दात्यांची संख्या कमी असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मेंदूपेशी मृत (ब्रेन डेड) रुग्णाच्या किडनीसह विविध अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी त्या-त्या रुग्णालयांतील समन्वयकांकडून रुग्णाच्या नातेवाईकांचे योग्य पद्धतीने समुपदेशन होणे गरजेचे आहे. तरच किडनीसह विविध अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना जीवदान मिळणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेफ्रोलॉजी सोसायटीच्या प्रयत्नांना यश

विदर्भातील अनेक छोट्या जिल्ह्यांमधून डायलिसिस केंद्र सुरू करण्याची मागणी नेफ्रोलॉजी सोसायटीकडे होत आहे. त्यामुळे भविष्यात किडनी विकाराने ग्रस्त रुग्णाला त्यांच्याच जिल्ह्यात डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सोसायटीव्दारे सीएमईच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपणासह इतर आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात येत असल्याने त्याचे फायदेही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘टॅट्यू’चे फॅड किडनीसाठी धोकादायक

तरुणाईत शरीरावर टॅट्यू काढण्याचे फॅड आहे. यासाठी वापरण्यात येणारी लीड धोकादायक ठरू शकतो. असेच नागपुरातच एका तरुणीला किडनीशी संबंधित समस्या उद्‍भवली असून ती आता डायलेसिसवर असल्याचे डॉ. चौबे यांनी सांगितले.

अवयवदानाची जाणीव शालेय जीवनापासून व्हावी

देशात लाखो रुग्ण डायलिसिसवर असून त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, किडनी दाते मिळणे मोठे आव्हान आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातील मोठ्या वर्गाला अवयवदान म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, हे अद्यापही समजलेले नाही. त्यामुळे ही मूलभूत माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल, असे मत डॉ. चौबे यांनी व्यक्त केले.

एकाच छताखाली सर्वच सुविधा

डॉ. चौबे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजी, किडनी ट्रान्सप्लान्ट युरोलॉजी, डायलिसीस, चिकित्सा विभाग, मधुमेह, छाती चिकित्सा, गैस्टोएंट्रोलॉजी, बाल विशेषज्ञ, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, पोषण आहार, आयसीयू, कार्डियलॉजी, ऑर्थोपेंडिक, जनरल सर्जरी, फिजिओथेरपी, रेडियोलॉजी, पॅथॉलॉजी आणि फार्मसी या सर्वच सुविधा एका छताखाली उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT