Hypertension In Young Adults: चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये ३०व्या वर्षीच वाढतोय रक्तदाबाचा धोका! वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Rising Hypertension in Youth: चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणांना ३० व्या वर्षीच उच्च रक्तदाब होण्याची समस्या भेडसावते आहे. ही समस्या टाळण्यासाठी काय करता येईल आणि तज्ज्ञ काय सल्ला देतात, ते जाणून घ्या.
Hypertension In Young Adults
Hypertension In Young Adultssakal
Updated on

Why Young People are Getting Hypertension: जेव्हा तुमचा रक्तदाब सतत ठराविक प्रमाणापेक्षा जास्त असतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असे म्हणतात. रक्तदाब दोन मोजमापांमध्ये नोंदवला जातो; सिस्टोलिक दाब (हृदय आकुंचन पावताना निर्माण होणारा दाब) आणि डायस्टोलिक दाब (हृदय विश्रांतीत असताना असणारा दाब). या दोघांपैकी कुठलाही दाब दीर्घकाळ जास्त राहिल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरतो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), सध्या भारतात सुमारे २२ कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यापैकी केवळ १२ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे लवकर लक्षणं ओळखून उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

चुकीच्या जीवनशैलीमुळे ३० वर्षांखालील तरुणांमध्ये उच्च रक्तदाब वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. तज्ञांच्या मते, यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि किडनी विकारांचा धोका वाढतो. मात्र, जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि लिपिड प्रोफाइलसारख्या चाचण्या केल्यास हा धोका टाळता येतो.

Hypertension In Young Adults
Heart Health: आरोग्यदायी हृदयासाठी रक्तदाब नियंत्रण, योग्य आहार आणि जीवनशैलीतील महत्त्वाचे कोणते बदल करावेत जाणून घ्या एका क्लिकवर!

तरुणांमध्ये उच्च रक्तदाब वाढण्याची काही महत्त्वाची कारणे

असंतुलित आहार

जास्त मीठ, प्रक्रिया केलेले- पॅकेज्ड अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. कारण शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढले तर पाणी साचून राहते आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो.

लठ्ठपणा

तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यामुळे हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर जास्त ताण येतो. शरीराचं वजन वाढल्यावर हृदयाला रक्त पुरवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शकता वाढते. त्यामुळे वजन आटोक्यात आणणे हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप गरजेचं आहे.

व्यायामाचा अभाव

नियमित हालचाल न केल्याने हृदय कमकुवत होतं, रक्तवाहिन्या कडक होतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. तुम्ही नियमितपणे हालचाल किंवा व्यायाम करत नसाल, तर उच्च रक्तदाब होण्याचा धोका नक्कीच वाढतो.

Hypertension In Young Adults
World Obesity Day 2025: लठ्ठपणा आणि डोळ्यांच्या आरोग्याचा काय आहे संबंध? वेळीच काळजी कशी घ्यायची जाणून घ्या

धूम्रपान

सिगारेटमधील रसायने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. म्हणून धूम्रपान पूर्रपणे बंद करा.

मद्यपान

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्यानेही रक्तदाब वाढतो. त्यामुळे मर्यादित प्रमाणात मद्यपान करणे आवश्यक आहे. शक्य आल्यास हे टाळणे फायदेशीर ठरते.

प्रतिबंधात्मक उपाय

कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, धान्य आणि लो - फॅट डेअरी असा पदार्थांचा समावेश असावा. तसेच DASH (Dietary Approaches to Stop Hypertension) हा आहार विशेषतः रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

वजन नियंत्रणात ठेवा

थोडंसं वजन कमी केल्यानेही रक्तदाबात सकारात्मक फरक पडतो. योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता.

नियमित व्यायाम करा

आठवड्यात किमान १५० मिनिटे चालणे, सायकल चालवणे किंवा पोहण्यासारखा मध्यम-स्वरूपाचे व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहते आणि हृदयही मजबूत बनते.

धूम्रपान बंद करा

सिगारेट सोडल्यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात येतो. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या.

मद्यपान मर्यादित करा

मद्यपान करत असाल, तर ते मर्यादेत ठेवा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Hypertension In Young Adults
Silent Signs Of Kidney Damage: सकाळी उठल्यानंतर शरीर देत असलेल्या 'या' 5 इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका! असू शकतात किडनी खराब असण्याची लक्षणे

लिपिड प्रोफाइल चाचणीचे महत्त्व

हृदयाच्या आरोग्यासाठी लिपिड प्रोफाइल ही एक उपयुक्त तपासणी आहे," असे तज्ज्ञ सांगतात. या चाचणीत शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली जाते. जर वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) जास्त असेल आणि चांगला कोलेस्ट्रॉल (HDL) कमी असेल, तर हृदयविकाराचा आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे रक्तवाहिन्या आखूड होतात आणि त्यामुळे बीपी वाढतो. अशी स्थिती लक्षात येताच डॉक्टर तुमच्यासाठी जीवनशैलीत आवश्यक असलेले बदल सुचवू शकतात.

तरुण वयातच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवायला लागल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करणं, आहारावर लक्ष देणं आणि वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. लवकर निदान केल्यास, गंभीर समस्या निर्माण होण्यापासून बचाव करता येतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com