आरोग्य

दाढीमुळे कोरोनाचा धोका वाढतो; वाचा कारण

नामदेव कुंभार

कोरोना महामारीमुळे देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. काही ठिकाणी अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, दोन महिन्यांपासून सलून बंद आहेत. त्यामुळे अनेकांची दाढी आणि केस खूप वाढलेले चित्र आहे. काहींनी याचाच फायदा घेत दाढी स्टाइलमध्ये कोरली असेल. कोरोनामुळे लांब दाढी आणि मिशी सध्याचा फॅशन ट्रेंड झाला आहे. तुम्हीदेखील असंच हँडसम आणि स्मार्ट दिसण्यासाठी दाढी-मिशी ठेवत आहात, तर सावध राहा. कारण दाढी-मिशीमुळे कोरोनाचा (coronavirus) धोका वाढतो.

एएडी (American Academy of Dermatology) येथील डॉक्टर अॅन्टनी एम रोस्सी healthline.comला दिलेल्या मुलाखत म्हणतात, जर तुम्हाची दाढी अतिशय दाट असेल तर मास्क व्यवस्थित बसणार नाही. तो गळ्यापर्यंत जाईल. त्यामुळे तुमच्या नाकाकडे हवा जाण्याची शक्यता जास्त आहे. दाढी जास्त दाट आणि लांब असल्यामुळे मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसणार नाही. त्यामुळे मास्क घातल्यानंतरही कोरोनाचा धोका वाढू शकतो. दाढी दाट असल्यामुळे हवा आणि कण सहजपणे मास्क असतानाही तुमच्या नाकावाटे आत जाण्याची शक्यता बळावते. त्यामुळे दाट आणि लांब दाढी असल्यास कोरोना होण्याचा धोका वाढतो.

याचाच अर्थ असा की दाढी जास्त वाढली असेल तर श्वास घेताना, बोलताना, खोकताना अथवा इतर काही कारणामुळे विषाणू तुमच्याकडून दुसऱ्यापर्यंत अथवा दुसऱ्याकडून तुमच्यापर्यंत पोहचू शकतो. दाढी वाढल्यामुळे मास्कच्या खालून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे दाढी ट्रीम करणे, हा एकमेव उपाय आहे. चेहऱ्यावर जितके कमी केस असतील तितकाच फीट मास्क बसेल. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात दाढी वाढवताना एकदा विचार नक्की करा.

तुमची दाढी चेहऱ्याला खास लूक देत असली तरी, व्हायरसचा संपर्कात येण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. दाढी आणि मिशांमुळे व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. भलेही दाढी नसल्याने तुम्ही चांगले दिसत नसाल, मात्र मोठ्या दाढीपेक्षा दाढी नसणे तुम्हाला सुरक्षित ठेवते. कोरोनाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा दाढी नसलेला चेहरा कधीही चांगला आहे. याशिवाय क्लिन शेव, विस्कर्स, सोल पॅटचेस अथवा मिशा असल्यातरी चालतील, जेणेकरून मास्क व्यवस्थित चेहऱ्यावर बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' तारखेला परतीचा मान्सून धडकणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Panchang 11 September 2025: आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करावे

Kolhapur Gas Explosion : कोल्हापूर गॅस स्फोट प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या ५ वर्षीय प्रज्वलची झुंज व्यर्थ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Pro Kabaddi 12: यु मुम्बाची ताकद डिफेन्स की रेडिंग? कर्णधार सुनील कुमारने उलगडले रहस्य; पुणेरी पलटणबद्दल म्हणाला...

Latest Marathi News Updates : जरीपटका परिसरात एटीएम फोडले

SCROLL FOR NEXT