Men's Health Tips
Men's Health Tips esakal
आरोग्य

Men's Health Tips: सायकलिंगदरम्यान केलेली एक चूक ठरू शकते पुरुषांमध्ये नपुंसकतेचं कारण...

सकाळ ऑनलाईन टीम

Erectile Dysfunction: आरोग्य जपण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, काही रनींग तर काही सायकलिंग करतात. मात्र प्रत्येक गोष्टी करण्याची एक योग्य वेळ आणि पद्धत असते. त्यात तुम्ही फेरबदल करण्याचा प्रयत्न केलात तर त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागू शकतो. आज आपण सायकलिंग योग्यरित्या न केल्यास त्याचे पुरुषांवर काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.

नुकत्याच समोर आलेल्या एका निरीक्षणातून सायकल चालवणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बाब समोर आली आहे. एकाच जागी बऱ्याच वेळ बसून राहिल्याने नपुंसकता वाढते असे अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे सायकलिंग करणाऱ्या पुरुषांसाठी हा धोक्याचा इशारा ठरतोय.

इरेक्टाइल डिस्फंक्शन अर्थात नपुंसकता ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात संभोगासाठीची पुरक स्थिती निर्माण होत नाही. असे झाल्यास व्यक्तीमध्ये तणाव निर्माण होतो. तसेच डिप्रेशनही येते. संशोधनातून असे पुढे आले आहे की, याचा थेट परिणाम स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये दिसून येतो.

सायकलिंगमुळे पुरुषांच्या आरोग्यावर असा होतो परिणाम

तुम्ही सायकलवर बसताना तुमच्या शारीरिक अवयवांवरचा दबाव वाढतो. त्यामुळे नसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे इरेक्टाइल जिस्फंक्शनचा धोका वाढतो.

काय म्हणतं संशोधन?

पोलंडमधील व्रोकला मेडिकल यूनिवर्सिटीकडून करण्यात आलेल्या संशोधनातून हा पर्याय सुचवण्यात आला आहे की, सातत्यानं सायकलिंग करणाऱ्या पुरुषांनी इरेक्टाइल डिस्फंक्शनपासून बचाव करण्यासाठी ठराविक काळानंतर सायकलवरून उतरावं, उभं रहावं. सायकल चालवत असतानाही पॅडलवर किमान 10 मिनिटं उभं राहण्याला प्राधान्य द्यावं. सायकलला चांगली सीट असावी ही बाबसुद्धा इथं लक्षात घेतली गेली पाहिजे.

इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या भेडसावू लागल्यास पुरुषांमध्ये नपुंसकतेचा धोका तर बळावतोच पण, त्याशिवाय मधुमेह, हृदयरोग, व्यसनं, स्थूलता, प्रोस्टेट सर्जरी, कर्करोग, नैराश्य असे आजारही भेडसावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT