आरोग्य

Dates Benefits : खजूर खाण्याचे फायदेच फायदे; पाचवा फायदा वाचाल तर अवाक व्हाल!

सर्व पोषक घटक मिळवण्यासाठी तूम्हाला केवळ एकच फळ मदत करते.

सकाळ डिजिटल टीम

मिनरल्स, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसीड, लोह आणि कॅल्शिअम हे सर्व पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी लोक अनेक पदार्थ खायला सुचवतात. पण, हे सर्व पोषक घटक एकाच पदार्थामध्ये मिळतील तर किती बरं होईल, असा विचार करत असाल. तर, तूमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

सर्व पोषक घटक मिळवण्यासाठी तूम्हाला केवळ एकच फळ मदत करते. ते म्हणजे खजूर. होय, खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे तर तूम्ही ऐकतच आला आहात. पण, त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांची यादी खूप मोठी आहे. त्यामूळे संपूर्ण जसे सफरचंद परिपूर्ण मानले जाते. तसेच, आहारतज्ज्ञही खजूर खाणे लाभदायक असल्याचे सांगतात.

खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते.

खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात.

खजूरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. खजूरामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.

खजूर खाण्याचा फायदा हा की त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते. कारण खजूरमध्ये सेलेनियम, मॅगनिज, तांबे, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खजूर मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मेंदूतील प्लेक रोखण्यासाठी खजूर खूप उपयुक्त ठरतात. खजुराचे ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. खजूर रक्त वाढवण्याचे काम करते. अॅनिमियामध्ये खजूर खाल्ल्याने आराम मिळतो.

मेंदूसाठी खजूर खाण्याचे फायदे दिसून येतात. कारण काही संशोधनानुसार जे लोक नियमित खजूर खातात, त्यांची स्मरणशक्ती मजबूत राहते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या त्वचेला लवचिकता मिळते.

खजूरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. डोळे आणि दृष्टीचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे नक्कीच लाभदायक ठरू शकतात.

मेंदूसाठी खजूर खाण्याचे फायदे दिसून येतात. कारण काही संशोधनानुसार जे लोक नियमित खजूर खातात, त्यांची स्मरणशक्ती मजबूत राहते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या त्वचेला लवचिकता मिळते.

खजूरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. डोळे आणि दृष्टीचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे नक्कीच लाभदायक ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT