Oats
Oats Esakal
आरोग्य

Diabetes Diet Tips: गव्हाची पोळी खाल्ल्यानेही वाढू शकतो मधुमेह; जाणून घ्या कोणत्या पिठाची भाकरी असते फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : भारतीय लोकांची आहार घेण्याची एक वेगळीच शैली आहे. मात्र अलीकडच्या धकाधकीच्या काळात बदललेल्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे अनेक आजारांनी लोकांना ग्रासले आहे. यात विशेषतः मधुमेह (Diabetes) सारखा चिवट आजार मोठ्या प्रमाणात लोकांना होत आहे. मधुमेह झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी तुमचा आहार हा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. आपले असे अनेक पारंपारिक पदार्थ आहेत की जे मधुमेह झालेल्या लोकांना खाता येत नाहीत कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. असाच एक आपला पारंपरिक पदार्थ म्हणजे भाकरी किंवा पोळी.

भाकरी आणि पोळी ही भारतीय थाळीची शान आहे. विशेषतः उत्तर आणि मध्य भारतात पोळीचा समावेश रोजच्या जेवणात होतो. गव्हाच्या पिठाची पोळी आणि ज्वारी,बाजरी भाकरी सहसा आपल्या घरात बनवली जाते. मात्र गव्हाच्या पोळीमुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीला नुकसान होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने त वेगवेगळ्या पिठाच्या भाकरी खाणे फायद्याचे ठरू शकते.

चला तर मग जाणून घेऊया डायबिटीज झाल्यास कोणत्या पिठाच्या पोळया खाव्यात.

मधुमेहामध्ये जेव्हा आपण योग्य खाण्यापिण्याबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा आपले लक्ष पोळीकडे जात नाही. आपण फक्त फळे आणि भाज्यांबद्दलच सतत बोलतो. पण जर का तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर योग्य पिठाची पोळी किंवा भाकरी खाणेही खूप गरजेचे आहे.

ओट्स पोळ्या खाणे आहे फायदेशीर

गव्हाच्या पोळ्यां मध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जास्त कर्बोदके घेणे मधुमेही रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाही. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ओट्सच्या पोळ्या खाव्यात.

ओट्सच्या पोळ्या खाणे का आहेत फायदेशीर ?

ओट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. ओट्समध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. ओट्स पचनानंतर आरामात ग्लुकोज सोडतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. ओट्समध्ये गव्हाच्या तुलनेत कमी कार्बोहायड्रेट्स असतात, जे मधुमेहासह अनेक रोगांवर फायदेशीर आहे.


आता बघू या ओट्स पोळ्या कशा तयार करायच्या?

काही लोकांना सुरुवातीला ओट्स खाण्याचा कंटाळा येतो. पण तुम्ही एक नाही तर अनेक प्रकारे ओट्स बनवून खाऊ शकता. ओट्सच्या पोळीशिवाय तुम्ही त्यांची मस्त मसालेदार खिचडीही बनवुन खाऊ शकता. तसेच ओट्स दुधात घालूनही खाऊ शकता.ओट्स ची पोळी चविष्ट बनवण्यासाठी ओट्समध्ये मीठ, जिरे आणि कांदा घालून त्याचे धपाटे बनवता येते. ओट्सचा तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या आहारात समावेश करू शकता. मधुमेहासारख्या आजारात तुमचा आहार, व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली महत्त्वाची ठरते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ टाळल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT