Protein rich vegetarian food
Protein rich vegetarian food Esakal
आरोग्य

Protein Diet साठी अंडी आणि मांस खाणं गरजेचं नाही, या शाहाकारी आहारातूनही मिळेल भरपूर प्रोटिन

Kirti Wadkar

Protein rich vegetarian food: शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन Protin आवश्यक असतं. यामधील अमिनो ऍसिड शरीर निरोगी ठेवण्यास मदत करत. स्नायूंचा विकास आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं. प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला कायम थकवा जाणवू शकतो. Diet Tips Marathi Vegetarian Food which provides Proetin

तसंच रक्ताची कमी, सुस्तपणा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. म्हणून स्नायू, हाडं, त्वचा, केस आणि शरीराच्या अनेक अवयवांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त आहार Protein Diet घेणं गरजेचं आहे. चिकन, अंडी किंवा मांसाहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे शाहाकारींनी काय करावं, असा प्रश्न मांसाहार न करणाऱ्यांना पडतो.

जर तुम्ही मांसाहार करत नसाल तरी असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत. ज्यांच्या सेवनातून तुम्ही शरीरासाठी आवश्यक प्रोटीन मिळवू शकता. हे पदार्थ कोणते हे जाणून घेऊयात.

दूध- दुधाला कंप्लिट फूड मानलं जात. कारण दुधामध्ये शरीरासाठी आवश्यक सर्वच पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी दिवसातून दोन कप दुधाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. यामुळे हाडं मजबूत होण्यासोबतच शरीराला अनेक फायदे मिळतील.

पालक- पालकमध्ये प्रोटीनसोबतच मुबलक प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम देखील आढळतं. त्यामुळे आहारामध्ये पालकचा समावेश करणं गरजेचं आहे. एक कप पालकामध्ये जवळपास ५ ग्रॅम प्रोटीन आढळतं.

डाळी- विविध प्रकारच्या डाळींचं आहारामध्ये सेवन करणं हे शाकाहारांसाठी प्रोटीनसाठीचा उत्तम पर्याय आहे. तूर डाळ, उदीड दाळ तसंच मूग आणि चणा डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळतं. एक कप मसूर डाळीमध्ये जवळपास १९ ग्रॅम प्रोटीन असतं. यासाठीच प्रोटीनसाठी डाळींचं सेवन महत्वाचं ठरतं.

हे देखिल वाचा-

चणे आणि चवळी- यासोबतच अनेक कडधान्यांमध्ये देखील प्रोटीन उपलब्ध असतं. भिजवलेल्या किंवा मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीचा आहारात नियमितपणे समावेश केल्यास तुम्हाला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळेल.

एक कप उकडलेल्या चण्यांमध्य १६ ग्रॅम प्रोटीन आढळतं. तसंच १ एक चवळीमध्ये १६ ग्रॅम प्रोटीन उपलब्ध असतं.

शेंगदाणे- शेंगदाणे हा प्रोटीनचा एक उत्तम आणि बजेट फ्रेण्डली पर्याय आहे. जर ड्रायफ्रूट्सवर होणारा खर्च टाळून तुम्हाला एखादा स्वस्त पर्याय हवा असेल तर शेंगदाण्यांचं सेवन तुम्ही करू शकता.

सोयाबीन- शाकाहारींसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. दैनंदिन प्रोटीनची ७२ टक्के गरज सोयाबीनमुळे पूर्ण होवू शकते. १०० ग्रॅम कच्च्या सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅम प्रोटीन उपलब्ध असतं. त्यामुळे आहारात तुम्ही वेगवेळ्या प्रकारे सोयाबीनचा समावेश करू शकता.

ब्रोकोली आणि फूलकोबी- ब्रोकोली आणि फुलकोबी देखील प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. एक कप ब्रोकोलीमध्ये २.६ ग्रॅम प्रोटीन उपलब्ध असतं. तर एक कप चिरलेल्या फूलकोबीमध्ये २ ग्रॅम प्रोटीन आढळतं.

चिया सीडस्- चिया सिड्सचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यात प्रोटीनसोबत फायबर आणि अनेक पोषक तत्व आढळतात. १ चमचा चिया सीड्समध्य जवळपास २ ग्रॅम प्रोटीन उपलब्ध असतं.

हिरवा वटाणा- हिरवा वाटाणा म्हणजेच मटार प्रोटीनने समृद्ध आहे. एक कप मटार मध्ये ८ ग्रॅम प्रोटीन आढळतं. तसंच यात फायबर, पोटॅशियम, फायबर आणि कॉपर असल्याने अनेक फायदे होतात.

पनीर- प्रोटीनसाठी तुम्ही आहारामध्ये पनीरचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करू शकता. यात विटामिन बी ६, मॅग्नेशियम आणि फायबरचं प्रमाण देखील चांगलं असतं.

अशा प्रकारे शाकाहारींसाठी देखील प्रोटीनचे अनेक पर्याय उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT