Dengerous Food Combination  esakal
आरोग्य

Dengerous Food Combination : कारल्यासोबत चुकूनही खाऊ नका 5 गोष्टी, पडू शकतं महागात

तुम्हीही कारल्यासोबत या गोष्टी खात असाल तर वेळीच सावध व्हा

सकाळ डिजिटल टीम

Dengerous Food Combination : कारलं हे आरोग्याच्या दृष्टीने फार चांगलं आहे. कारलं खायला कडू लागत असलं तरी त्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही रोज कारल्याचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारले वरदान ठरतात. त्यामुळे इंसुलिन लेव्हल कंट्रोल होते. मात्र कारल्यासोबत काही गोष्टींचं मिश्रण शरीरासाठी फार घातक आहे. तेव्हा तुम्हीही कारल्यासोबत या गोष्टी खात असाल तर वेळीच सावध व्हा.

कारल्याची भाजी किंवा कारल्यापासून बनलेला पदार्थ खाल्ल्यानंतर या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका

दूध

कारलं आणि दूध यांचं काम्बिनेशन एकत्र खाल्ल्यास ते तुमच्या शरीरासाठी फार घातक ठरू शकतं. तेव्हा यो दोघांचं सेवन कधीही एकत्र करू नये. त्यामुळे तुमचं पोट खराब होणे, उलटी होणे, जळजळ होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.

दही

दही आणि ताक बऱ्याच लोकांना आवडतं. तुम्ही कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर लगेच दही किंवा ताक पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण दही आणि ताकात लॅक्टिक अॅसिड असते. त्यासोबत तुम्ही कारली खाल्ल्यास त्याची रिअॅक्शन तुमच्या शरीरावर दिसू शकते. तुम्हाला स्कीन रॅशेस आणि खाजेची समस्या उद्भवू शकते.

आंबा

आंबा जेवढा गोड आणि चवदार आहे तेवढंच कारलं कडू असतं. म्हणून या दोन गोष्टी सोबत खाऊ नये. त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. यामागचं कारण म्हणजे या दोन गोष्टी एकत्र पचायला फार जड जातात.

मूळा

कारल्यासोबत मुळा खाणे फार धोकादायक मानल्या जातं. दोघांमध्ये वेगवेगळे पोषक तत्व असल्याने तुम्हाला अॅसिडीटी किंवा गळ्यात कफ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

भेंडी

कारले खाल्ल्यानंतर भेंडीचं सेवन अजिबात करू नका. असे केल्या कारले आणि भेंडी एकत्र पचवण्यास शरीरालादेखील समस्या येतील. तुम्ही त्यात आजारी देखील पडू शकता.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : चीनने जमीन हडपली कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर हे बोलला नसतात, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Ind vs england 5th Test : ''आजच्या काळात अशा चुका परवडणाऱ्या नाहीत''; आर. अश्विनने गिलच्या चुकांवर ठेवलं बोट,संघाच्या रणनीतीवर व्यक्त केली तीव्र नाराजी...

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; तुमच्या शहरातील भाव काय आहे?

लग्नात नेसलेली आजीची साडी आणि उधारीचा हनिमून ! सुबोध - मंजिरीच्या अतरंगी लग्नाची गोष्ट

Viral News : ५० वर्षांच्या महिलेचे १८ वर्षांच्या तरुणाशी लग्न; मुलीने अन् जावयाने पोलिसांत घेतली धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT