dry fruits sakal
आरोग्य

Healthy Lifestyle: आठवड्याभरात वजन होणार कमी; या वेळी करा ड्रायफ्रुट्सचे सेवन

सामान्यत: आरोग्य उत्तम राखण्यासाठी ड्राय फ्रूट्स भरपुर प्रमाणात खाल्ली जातात पण ते कधी खावे हे ही तितकेच महत्वाचे आहे

सकाळ डिजिटल टीम

सुका मेवा आरोग्यासाठी चांगला असतो, परंतु काही ड्रायफ्रूट्स रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमचे आरोग्य अधिक पटींनी सुधारते आणि त्याचे वेगवेगळे फायदेही तुमच्या शरीराला मिळतात. सामान्यत: आरोग्य उत्तम राखण्यासाठी ड्राय फ्रूट्स भरपुर प्रमाणात खाल्ली जातात पण ते कधी खावे हे ही तितकेच महत्वाचे आहे कारण काही ड्राय फ्रूट्स रिकाम्या पोटी खाणे शरीरासाठी खूप चांगले असतात.

सुका मेवा हा एक-दोन नव्हे तर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. काही सुका मेव्यात जीवनसत्त्वे आढळतात तर काही मध्ये प्रथिने आढळतात परंतु कोणती ड्राय फ्रूट्स रिकाम्या पोटी खावीत आणि कोणती खाऊ नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाण्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात याविषयी माहिती पाहु या.

ड्राय फ्रूट्स रिकाम्या पोटी खाणे महत्वाचे आहे. तुम्ही सकाळी भिजवलेले काही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता आणि काही न भिजवता खाऊ शकता. काही ड्रायफ्रूट्समध्ये चांगले फॅट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतात, तर काही ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास किंवा वजन वाढण्यासही मदत होते

1) खजुर

खजुरात पाचक फायबर मोठया प्रमाणात असल्यामुळे, सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने खुप वेळ पोट भरल्यासारख वाटतं. जर का तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर खजूर तुमच्यासाठी सकाळच्या नाश्ताकरता उत्तम ठरेल.

2) काळा मनुका

रिकाम्या पोटी काळा मनुका खाल्ल्याने तुमच्या शरीराला चांगल्या प्रमाणात लोह मिळते. हे पचनास मदत करते आणि ऍसिडिटी, पोटदुखी, आणि अपचन टाळते. तुम्ही भिजवलेले मनुकेही खाऊ शकता.

3)बदाम

बदाम बहुतेक करुन भिजवून खाल्ले जाते. भिजवलेले बदाम रिकाम्या पोटी खाणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. बदाम हे फायबर, कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे .तसेच बदामात व्हिटॅमिन ई देखील भरपूर प्रमाणात असते.

आयुर्वेदातही बदामाचे रोज सेवन करावे असे सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणते ड्रायफ्रुट्स रिकाम्या पोटी खाऊ नयेत. खरे तर असं कोणतही ड्राय फ्रूट नाही जे रिकाम्या पोटी खाऊ शकत नाही.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सकाळी कोणतेही ड्रायफ्रूट खाऊ शकता आणि होय हे लक्षात घ्या की तुम्ही या ड्रायफ्रुट्सचे सेवन रिकाम्या पोटी मर्यादित प्रमाणातच करावे कारण त्यांचा प्रभाव उष्ण असतो, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. ही माहिती आम्ही तुम्हाला सामान्य पणे सांगत आहोत. हे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. अधिक माहिती करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT