Easy Fitness Tips esakal
आरोग्य

Easy Fitness Tips : व्यायामाचा आळस करणाऱ्या लोकांसाठी, सोपा फिटनेस फंडा

अनेकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. मग फिट कसे रहायचे? जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

Easy Fitness Tips In Marathi : नोकरीचं, कामाचं बिझी शेड्युलमुळे व्यायामाला वेळच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. बऱ्याच लोकांची सबब असते की, त्यांना व्यायामा करण्याचा किंवा जीममध्ये जाण्याचा कंटाळा येतो, अशा लोकांनाही त्यांच्या फिटनेसची चिंता तर सतावतच असते. अशा वेळी काही पर्याय आहे का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर घेऊन आलो आहोत. १, २ नाही तर ८ सोप्या प्रकारे तुम्ही हेल्दी राहू शकतात.

Easy Fitness Tips

पर्यायी उपाय

पायऱ्यांचा वापर

चालण्याचा व्यायामही होत नाही म्हटल्यावर ऑफीसमध्ये किंवा कुठेही लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा. कामाच्या ठिकाणी लहान, सहान फोन कॉलसाठीही जागेवरून उठा आणि चालत फोनवर बोला.

घरची स्वच्छता

आळस आणि सुस्ती घालवण्यासाठी घराची साफसफाई करा. डीप क्लीनिंग करा. यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे फिट राहू शकतील.

Easy Fitness Tips

डेस्क जॉब

जर तुमचा डेस्क जॉब असेल तर दर आर्ध्या तासाला उभे रहा. एक चक्कर मारून मग पुन्हा जागेवर बसा.

पाळीव प्राणी पाळा

पाळीव प्राणी पाळणे हे यावर एक उत्तम पर्याय होऊ शकते. कारण प्राण्याला फिरायला नेण्याच्या कारणाने तुमचाही वॉक होतो.

Easy Fitness Tips

हालचाली

टीव्ही बघत असला तरी एका जागी बसून बघू नका हालचाल करा शिवाय हलका, फुलका व्यायाम या वेळात करा.

सोशल अॅक्टीव्हिटी

एका जागी बसून सोशल अॅक्टीव्हिटी करण्याऐवजी शारीरिक हालचाली असणाऱ्या अॅक्टिव्हिटी कराव्या. यामुळे मन आणि शरीर दोन्हीही अॅक्टीव्ह राहते.

Easy Fitness Tips

स्वयंपाक

जेवण बनवण्याची इच्छा नसतानाही ते बनवा आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घाला.

बागकाम

बागकाम करा. त्यात वेळ घालवल्याने झाडांकडून भरपूर ऑक्सीजन मिळतो आणि हालचालही होते.

खेळ

तुमच्या आवडीचे मैदानी खेळ खेळा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही फ्रेश होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT