Health Care  esakal
आरोग्य

Health Care : सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स इत्यादी पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे मेंदू तल्लख होण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती ही सुधारते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : अक्रोड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अक्रोडचे सेवन केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स इत्यादी पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे मेंदू तल्लख होण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती ही सुधारते.

विशेष म्हणजे थायरॉईड सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील अक्रोड फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कोणते आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

हाडांना मिळते बळकटी

जर तुम्ही रोज सकाळी भिजवलेल्या अक्रोडचे रिकाम्या पोटी सेवन केले तर यामुळे, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते, तसेच दातांची मजबूती देखील वाढते. अक्रोडमध्ये समाविष्ट असलेले अल्फा लिनोलेनिक हे अ‍ॅसिड हाडांची बळकटी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे, हाडांना आणि दातांना मजबूत करण्यासाठी नियमितपणे अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर ठरते. (Bones get stronger)

मधुमेहाला ठेवते नियंत्रित

रोज सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. खास करून अक्रोडचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने टाईप-२ डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो.

त्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांनी आणि टाईप-२ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. (diabetes keeps under control)

हृदयाला ठेवते निरोगी

अक्रोडमध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमध्ये ओमेगा-३ अ‍ॅसिडचा समावेश आढळून येतो. या अ‍ॅसिडमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे, अक्रोडचे रिकाम्या पोटी सेवन करणे, हे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. (heart keeps healthy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT