heart patient Sakal
आरोग्य

Weather Change : अतिथंडी अन् उष्णतेमुळे हार्ट पेशंटचा होऊ शकतो मृत्यू : Study

बदलत्या हवामानाचा लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Weather Linked To Cardiovascular Deaths : बदलत्या हवामानाचा लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. वातावरणातील होणाऱ्या सततच्या बदलामुळे मृत्यूचा धोका संभवू शकतो असा खुलासा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 'सर्क्युलेशन' जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि हवामान यांच्या संबंधांबाबत करण्यात आलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अति थंडी आणि उष्णतेमुळे हृदयासंबंधी आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रूग्णांचा मृत्यू होऊ शकतो असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे. याशिवाय हवामानातील बदलामुळे विविध प्रकारच्या संसर्गाचा धोकाही अनेक पटींनी वाढतो असेही यात नमुद करण्यात आले आहे.

हवामानबदल या व्यक्तींसाठी घातक

एएनआयच्या वृत्तानुसार, एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, अति थंड किंवा अति उष्ण हवामानामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराने ग्रस्त लोकांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 'सर्क्युलेशन' जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, थंड वातावरणात हृदयाच्या धमन्या आकसतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. याशिवाय स्ट्रोक आणि हृदयाशीसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मृत्यू होण्याचा दाट धोका असतो. त्यामुळे अति थंडी किंवा उष्णता असलेल्या हवामानात हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असलेल्या रूग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, उच्च तापमानामुळे जगभरात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रुग्णांच्या दर 10,000 मृत्यूंमागे 22 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अत्यंत कमी तापमानामुळे 91 अतिरिक्त लोकांचा मृत्यू होत आहे. अशा प्रकारचे मृत्यू टाळण्यासाठी रूग्णांनी अति थंडी किंवा अति उष्ण तापमानात न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

3.20 कोटी लोकांच्या डेटाचे विश्लेषण

या संशोधनात, संशोधकांनी 5 खंडांमधील 27 देशांमधील 1979 ते 2019 या कालावधीतील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूंवरील डेटाचे विश्लेषण केले आहे. हा संशोधन अहवाल सुमारे 3.20 कोटी (32 दशलक्ष) लोकांच्या डेटाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. यात ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे. जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांच्या मृत्यूचे अति थंड किंवा अति उष्ण तापमान हे प्रमुख कारण ठरत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Meeting NCP Leader : अमोल मिटकरीनंतर राष्ट्रवादीतील दुसरा नेता नाराज, थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

Nanded News: एटीएम सेवा केंद्रांचा बोजवारा;कधी पैशांची वानवा, तर कधी सुविधांची कमतरता;एसी शोभेची वस्तू , तुटलेले दरवाजे, निकामी यंत्रणा

कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही जितेंद्र यांची पत्नी, 'हे' फोटो पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल

Buddha Purnima: बुद्धांचा कालामसुत्त: स्वानुभवावर आधारित विवेकाचा उपदेश; सोशल मीडियाच्या युगात कालामसुत्ताचा तरुणांसाठी मार्गदर्शन

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

SCROLL FOR NEXT