Eye Care Tips  esakal
आरोग्य

Eye Care Tips : आहारातून या पदार्थांची करा सुट्टी, तरच सुधारेल दृष्टी!

डोळे उत्तम ठेवायचे असतील तर या गोष्टींचे सेवन वाढवा

Pooja Karande-Kadam

Eye Care Tips : पावसाळ्यात डोळ्यांचा फ्लू हा आजार सामान्य आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला नेत्रश्लेष्मलाशोथ म्हणतात. याला पिंक आय इन्फेक्शन असेही म्हणतात. डोळ्यात जळजळ, सूज आणि लालसरपणा ही डोळ्याच्या फ्लूची मुख्य लक्षणे आहेत. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काही पदार्थ खाणे टाळावे.

डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह म्हणजेच डोळ्यांचा फ्लू हा पावसाळ्यातील एक सामान्य आजार आहे. त्यामुळे अनेकदा डोळे लाल होतात. याशिवाय डोळ्यांना खाज सुटणे, पाणी येण्याची समस्या उद्भवते. (If you want to keep your eyes healthy, then exclude these foods from your diet today)

डोळ्यांवर घाण जमा झाल्यामुळे सकाळी ते उघडण्यास त्रास होतो. अशा स्थितीत डोळे सुजलेले दिसतात आणि त्या व्यक्तीला जास्त प्रकाशात जाण्याचा त्रास होतो.  

तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाहीत.

ब्रेड आणि पास्ता

संशोधनानुसार, ब्रेड आणि पास्तामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट्स वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनची शक्यता वाढवतात. ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.  तुमचे शरीर या प्रकारचे कार्बोहायड्रेट अधिक लवकर पचते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात.

हायड्रोजनेटेड ऑइल आणि ट्रान्स फॅट

आरोग्य तज्ञांच्या मते, हायड्रोजनेटेड ऑइल आणि ट्रान्स फॅट्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. ट्रान्स फॅटमुळे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे रक्तवाहिन्या अडकणे. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि दृष्टी कमी होणे देखील होऊ शकते.

सोडियम

ज्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. कालांतराने, उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांचे नुकसान, डोळयातील पडदा खाली द्रव साठणे आणि रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे नसा नष्ट होतात. या सर्व समस्यांमुळे अस्पष्ट दृष्टी आणि दृष्टी कमी होऊ शकते.

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात मिठामुळे शरीरात उच्च रक्तदाब होऊ शकतो. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांसह डोळ्यांच्या समस्या देखील होऊ शकतात.

दारू

केवळ खाद्यपदार्थच नाही तर अल्कोहोल ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. लहान वयात जास्त मद्यपान केल्याने मोती

या गोष्टींचे सेवन वाढवा

बदाम : हा एक उत्तम सुका मेवा आहे, ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील चांगले असते. ज्याचा वापर डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

टोमॅटो : टोमॅटो देखील डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये ल्युटीन, लाइकोपीन नावाचे घटक असतात, जे दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स डोळे निरोगी ठेवतात, डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवतात. 

ब्रोकोली : डोळ्यांना कोणत्याही आजारापासून वाचवायचे असेल तर भाज्यांमध्ये ब्रोकोलीचा समावेळ करा. ब्रोकोली रेटिनाला कोणत्याही प्रकारच्या रॅडिकलपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. भाज्यांमध्ये असलेले सल्फोराफेन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT