upwas sakal
आरोग्य

Ashadhi Ekadashi 2022: उपवास करताना 'या' पाच गोष्टींची काळजी तुम्ही घेता का?

नेकदा उपवास करताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, जे अत्यंत चुकीचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्त उपवास करतात. विठ्ठलाची आराधना करण्यासाठी हा उपवास केला जातो पण अनेकदा उपवास करताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, जे अत्यंत चुकीचं आहे. उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. (follow these five tips while fasting )

उपवासाचा खरा अर्थ पोटाला आराम देणे हा असून तसे न होता अनेकदा उपवासाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच किंबहुना त्याहून जास्त खाण्याकडे कल असल्याचे दिसते. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे उपवास करताना आपल्याला काळजी घेता येईल. (how to take care while fasting)

  • उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण शेंगदाण्यामध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. सोबतच पित्ताचा त्रास असेल तर दाण्याचा आणखी त्रास होऊ शकतो.

  • मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे कार्बोहायड्रेट जास्त देणारे पदार्थ असल्याने मधुमेही लोकांनी याचा अती वापर टाळावा.

  • ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

  • वजन वाढीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास हा वजन वाढवतो. आणि उपासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर वजन वाढ होते.

  • खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा हे पदार्थ उपवासाच्या दृष्टीने चांगले. त्यामुळे शरीरात त्राण टिकून राहतो आणि त्रास होण्याची शक्यताही कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT