earphone
earphone sakal
आरोग्य

'या' देशात Earphone मुळे चक्क बहिरे होताहेत लोक, जाणून घ्या लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि त्यातही प्रत्येकाच्या कानात इअरफोन घातलेले दिसतात. व्हिडिओ पाहणे आणि ऑडिओ ऐकण्याव्यतिरिक्त कॉलवर बोलण्यासाठीसुद्धा इअरफोनचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का हा छोटासा इअरफोन तुम्हाला बहिरे बनवू शकतो आणि चक्क एका देशात असे घडत आहे. जिथे एक चतुर्थांश लोकसंख्या कानात इअरफोन वापरल्यामुळे बहिरे होत आहे. चला या देशाविषयी जाणून घेऊया. (France people have been issue of less hearing, know its side effects and symptoms)

फ्रान्समधील 25 टक्के लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झाली.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की फ्रान्समधील चारपैकी एका व्यक्तीला ऐकण्याच्या समस्या आहेत. फ्रान्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्यामध्ये 18 ते 75 वर्षे वयोगटातील सुमारे 460 लोकांचा समावेश होता. (deafness)

सोशल आइसोलेशन, डिप्रेशन आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकणे यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा दावा केला जातोय.

इअरफोनचा जास्त वापर कराल तर ही लक्षणे दिसेल

1. कान दुखणे

मोठ्या आवाजात म्युझिक ऐकायला खूप मजा येते. पण ही मजा तुमच्यासाठी शिक्षाही बनू शकते. मोठ्या आवाजात गाणे ऐकून आणि इतर लोकांशी इअरफोन शेअर केल्याने जर्म्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानात घाण साचते. त्यामुळे अनेकवेळा कानात इन्फेक्शन, ऐकण्याची समस्या आणि कानात आवाज येण्याच्या समस्या आढळतात


2. हृदयरोग

मोठ्या आवाजात म्युझिक ऐकल्याने कानावरच नाही तर हृदयावरही वाईट परिणाम होतो. जेव्हा मोठ्या आवाजात म्युझिक ऐकले जाते तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. जे दीर्घ काळानंतर तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात.

3. ऐकायला कमी येणे किंवा बहिरेपणा

इयरफोनचा जास्त वापर केल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, तासन् तास इअरफोन वापरल्याने चक्कर येणे, निद्रानाश, डोकेदुखी आणि कान दुखणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता 90 डेसिबल असते. पण बहिरेणामुळे ही क्षमता 40-50 डेसिबलने कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT