Health Tips
Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : लद्दाखचं हे फळ फक्त मधुमेहच नव्हे तर कँसरसारख्या आजारालाही पळवेल दूर, वाचा सविस्तर

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips : मधुमेह आणि कँसर या दोन्ही आजारांचं नाव जरी घेतलं तरी त्याचं गांभीर्य लक्षात येतं. हे आजार ज्यांनाही आहेत ते लोक त्यातून सुटका करण्यासाठी वाटेल ते उपाय करायला तयार असतात. आज आपण असा नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत ज्याने तुमचे मधुमेह आणि कँसरसारखे आजार तुम्हाला नियंत्रणात ठेवता येतील.

गोजी बेरी हे लद्दाखमध्ये आढळणारे एक आशियाई फळ आहे, ते आकाराने लहान आहे परंतु ते खूप उपयुक्त आहे तसेच खाण्यास गोड आहे व भरपूर प्रमाणात पोषकही आहे. त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, जस्त आणि थायामिन आहे.

या फळामध्ये सेलेनियम कॉपर रिबोफ्लेविन, लोह अमीनो ऍसिड असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. लद्दाख व्यतिरिक्त, हे प्रामुख्याने चीनमध्ये देखील आढळते आणि गोजी बेरीचा वापर चीनमध्ये 2000 वर्षांहून अधिक काळ औषध म्हणून केला जात आहे.

मधुमेह: गोजी बेरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात, म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 2015 च्या अभ्यासात असे आढळून आले की गोजी बेरी रक्तातील इंसुलिन आणि ग्लुकोजचे प्रमाण संतुलित करतात. गोजी बेरी टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये एचडीएल पातळीही वाढवतात.

किडनीच्या आजारावर फायदेशीर : चीनमध्ये एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल तर गोजी बेरीचा वापर केला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननुसार, गोजी बेरी यकृताचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहेत. यकृताच्या कर्करोगाच्या पेशींवरील संशोधनात असे दिसून आले आहे की गोजी बेरी ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात. (Diabetes)

कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त: ड्रग डिझाईन डेव्हलपमेंट किंवा थेरपी जर्नलमधील काशिद यांनी दिलेल्या अहवालानुसार, गोजी बेरी ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि बरे होण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, म्हणूनच कर्करोगाच्या रुग्णांना आहारात गोजी बेरी समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात असलेले व्हिटॅमिन सी, कॅरोटीनोइड्स, झेक्सॅन्थिनसह अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींशी लढतात, आणि शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. (Cancer)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT