Gomutra Ark Side Effects sakal
आरोग्य

Gomutra Ark Side Effects : तुम्ही पवित्र गोमूत्राचं सेवन करता का? सावधान, संशोधनातून समोर आलंय...

गोमूत्राचे हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gomutra Ark Side Effects : गोमूत्राचे हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक पूजा विधिमध्ये गोमूत्राला विशेष स्थान आहे. त्यामुळे गोमुत्र हे एक पवित्र जल म्हणून संबोधले जाते. अनेकजण गोमूत्राचे सेवनही करतात. जर तुम्हीही गोमूत्राचे सेवन करत असाल तर सावधान.. कारण पवित्र समजले जाणाऱ्या गोमूत्रात अनेक धोकादायक बॅक्टेरीया असतात ज्याचे सेवन माणसासाठी योग्य नसते.

देशातील पाळीव प्राण्यांशी संबधित रिसर्च करणारी फेमस संस्था ICAR-इंडियन वेटेरिनरी रिसर्च इंस्टिट्यूट रिसर्च मध्ये ही बाब समोर आली आहे की बरेलीमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये म्हशीचं मूत्र अधिक परिणामकारक असल्याचं समोर आलंय. (Gomutra Ark Side Effects never drink gomutra read what research said)

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्याच्या इज्जतनगर मध्ये भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेमध्ये (IVRI) भोजराज सिंह आणि पीएचडीच्या 3 विद्यार्थ्यांनी रिसर्च केला. आरोग्यदायी असणाऱ्या गायींच्या दूधामध्ये कमीत कमी 14 प्रकारचे बॅक्टेरिया सापडले जातात. यामध्ये Escherichia coli चा सुद्धा समावेश असतो. ज्यामुळे पोटाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.

गाय, म्हशी आणि माणसांच्या यूरीन सँपलमधून स्टॅटिस्टिकल विश्लेषणांमध्ये म्हशीचे यूरीन, हे गायींच्या यूरीनपेक्षा अधिक लाभदायक असते. म्हशीचं यूरीन, S Epidermidis आणि E Rhapontici सारख्या बॅक्टीरियांवर अधिक प्रभावी असतं.

गायीचं मुत्र म्हणजेच गोमूत्र अँटी-बॅक्टीरियल असतं, असा सर्वसाधारणपणे सर्वांचा समज असतो. मात्र गोमूत्रचे कधीच माणसांनी सेवन करू नये, असे या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र सोबतच गायीच्या डिस्टिल यूरीन मध्येही धोकादायक बॅक्टेरीया असतात की नाही, यावर आजही रिसर्च सुरू आहे. IVRI यांनी हे सुद्धा सांगितले की गायीचं डिस्टिल यूरीन कँसर आणि कोरोनाविरोधात लढण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT