Gossipes Tips esakal
आरोग्य

gossips : गॉसिप करायला हवं! कारण त्याने स्ट्रेस कमी होतो

पूर्वीच्या काळी होणारे हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा यांसारखे सण-समारंभ म्हणजे गॉसिपिंगसाठीची उत्तम जागा

सकाळ डिजिटल टीम

Gossipes Tips : 'पण तिने अचानक ब्रेकअप का केलं?''हो ना. मलाही आश्चर्यच वाटतंय; पण तिला थेट कसं विचारणार ना जाऊन?''असं कसं? तिला व्यवस्थित विचारलं पाहिजे. त्यांचं नेमकं काय बिनसलं ते..... सांगण्यासारखं नसलं, तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे ना.

ही अशी कुजबुज ऐकली, की आपली पहिली प्रतिक्रिया असते ती 'काय गॉसिपिंग चाललंय?' बऱ्याचदा आपल्याला असं म्हंटल जातं की गॉसिपिंग चांगलं नसतं वगैरे, असं बरंच काही... थोडक्यात, गॉसिपिंगविषयीचे अनेक नकारात्मक विचार आपल्याही नकळत मनात डोकावतात आणि त्यातून आपल्या प्रतिक्रिया उमटतात म्हणून ते टाळलेलं बरं. पण तुमच्या माहितीसाठी सांगते की वाईट असूनही काही सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.आधी आपण गॉसिपचे फायदे बघू आणि नंतर मग इतर वाईट सवयींचे फायदे बघू.

तर पूर्वीच्या काळी होणारे हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा यांसारखे सण-समारंभ म्हणजे गॉसिपिंगसाठीची उत्तम जागा. बायकांना एकमेकांत मिसळायला, हितगुज करायला मिळावं याचसाठी तर ही सोय होती. त्यामुळेच इथंही सास्वा-सुना, लहान मुली असे वेगवेगळे गट असायचेच. आता अर्थातच तसं राहिलेलं नाही. सार्वत्रिक जीवनात आजही आपली गॉसिपिंगची गरज कायम असली, तरी ते तितक्या खुलेपणानं करता येतंच असं नाही.

निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे आपल्याविषयी झालेल्या गॉसिपिंगमधून काही नवा दृष्टिकोन मिळतो. गॉसिपींग सकारात्मक होऊ शकतं. मागे झालेल्या एका सवेर्क्षणात गॉसिपिंग हा शेअरिंगचा एक उत्तम मार्ग असल्याचं म्हटलंय. दिवसभरातल्या पटणाऱ्या, न पटणाऱ्या, आवर्जून सांगाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. मन मोकळं व्हायला त्यातून मदत होते.

आता फक्त गॉसिपच नाही तर नखं कुरतडणं, केसात सतत हात घालणं, अस्ताव्यस्त बसणं या सवयी नेहमीच वाईट मानल्या गेल्या. या सवयींमुळे, लहानपणी कदाचित प्रत्येक व्यक्तीने टोमणे ऐकले असतील, पण तरीही या सवयी माणसाच्या जीवनाचा एक भाग असतात. वाईट असूनही अनेक सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बऱ्याच जणांना स्ट्रेस मध्ये आल्यावर नखं कुरतडण्याची सवय असते. अशाप्रकारे नखं कुरतडणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं असं शास्त्रज्ञांचे मत आहे. दातांनी नखं चावल्याने शरीरात नवीन जीवाणू तयार होतात जे भविष्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात.

उशीरा पोहोचण्याची सवय

काही लोक कधीच ऑफिस किंवा घरी वेळेवर पोहोचत नाहीत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अभ्यासानुसार, जे लोक वेळेबाबत बेफिकीर असतात, त्यांचा ताण कमी असतो. तसेच, ते इतर लोकांपेक्षा अधिक आनंदी आणि निरोगी जीवनशैली जगतात. त्यामुळे कधी कधी वाईट सवयी माणसाला बिघडवू शकतात, पण काही सवयी आरोग्य सुधारू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT