Summer Health Care esakal
आरोग्य

Summer Health Care : उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद खा अन् निरोगी राहा, लगेच नोट करा रेसिपी

तज्ज्ञ उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद खाण्याचा सल्ला देतात

साक्षी राऊत

Summer Health Care : तज्ज्ञ उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद खाण्याचा सल्ला देतात. कारण गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनणाऱ्या गुंलकंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तेव्हा हे आरोग्यदायी गुलकंद घरच्या घरी कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे जास्तीत जास्त थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात थंड पदार्थांचे सेवन केल्याने तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम सुधारते. गुलकंदसुद्धा फार थंड आहे. बरेच लोक याला पानात मुखवास म्हणून सुद्धा खातात. गुलकंद बनवणे फार सोपे आहे. तुम्ही खरीसुद्धा अगदी सहज बनवू शकता. तेव्हा उन्हाळ्यात गुलकंद बनवण्याचे फायदे जाणून घेऊया.

असे बनवा गुलकंद

गुलकंद बनवण्यासाठी तुम्हाला गुलाबाच्या ताज्या पाकळ्या घ्याव्या लागेल. यासाठी तुम्ही गावरान गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तर फारच छान. या गुलाबाच्या पाकळ्या नीट स्वच्छ धुवून घ्या. आता सम प्रमाणात साखर आणि खडी साखर घ्या. आता साखर आणि पाकळ्या एक बरणीत भरा. बरणी ही काचेची घ्या जेणेकरून ती उन्हात ठेवल्यानंतर गुलकंद व्यवस्थिक राहील. ही बरणी १२-१५ दिवसांसाठी उन्हात ठेवा. गुलाबाच्या पाकळ्यांची एक लेयर टाकल्यानंतर त्यावर साखरेची लेयर टाकावी. तुम्ही यात चवीसाठी विलायची देखील टाकू शकता.

उन्हाळ्यात गुलकंद का खावे?

गुलकंद खाल्ल्याने थकवा, वेदना, स्नायूचे दुखणे, पोटातील उष्णता यांसारख्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. बऱ्याच लोकांना तळहात आणि तळपायात जळजळ होते. अशावेळी त्यांनी रोज गुलकंद खावे. तुम्ही गुलकंद नुसतेच किंवा शरबत किंवा लस्सीमधे टाकूनही खाऊ शकता. (Summer)

गुलकंद खाण्याचे फायदे

तोंडावरील अल्सरसाठी गुलकंद फायद्याचे. कारण शरीरातील अतिउष्णतेमुळे तोंडामधे अल्सर येतात.

यात मोठ्या प्रमाणात लोह असते. महिलांना मासिक पाळीच्या वेळी ओटी पोटात दुखत असेल तर अशा वेळी त्यांनी गुलकंद खावे आराम मिळेल.

यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्लि़डंट्स असल्याने बॉडी डिटॉक्स होते.

उन्हाळ्यात नाकातून रक्तप्रवाह झाल्यास गुलकंद खावे.

उन्हाळ्यात घामाचा घाणेरदा वास येणाऱ्यांनीही गुलकंद खावे. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT