Heath Alert  esakal
आरोग्य

Heath Alert : मागच्या खिशात पाकीट ठेवताय? जरा सांभाळून! हा प्रकार आरोग्याला पडू शकतो भारी

सततचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरही आता लोकांना हा असे न करण्याच्या सूचना देत आहेत.

सकाळ ऑनलाईन टीम

Heath Alert :

जर पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स ठेवण्याची सवय असेल, तर काळजी घ्यायला हवी. एखाद्या दिवशी हा प्रकार आरोग्याला भारी पडू शकतो. वास्तविक, यामुळे लोक फॅट वॉलेट सिंड्रोमला बळी पडत आहेत. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. सततचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरही आता लोकांना हा असे न करण्याच्या सूचना देत आहेत.

नेमके काय होते ?

डॉक्टरांच्या मते, पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स ठेवण्याची सवय आरोग्याला मारक ठरू शकते. खरं तर, तरुणांची ही सवय आहे की ते महत्त्वाच्या कागदपत्रांपासून ते पैशांपर्यंत आणि सर्व एटीएम आणि क्रेडिट कार्ड त्यांच्या पाकिटात ठेवतात. पर्स खूप जाड होते आणि जेव्हा लोक पर्स पँटच्या खिशात ठेवून बसतात, तेव्हा त्याचा दाब नितंबावर पडतो आणि नितंबवर येते.यामुळे नितंबांचे संतुलन बिघडते आणि लोक फॅट वॉलेट सिंड्रोमच्या विळख्यात येतात.

सायटिका होण्याची शक्यता

हळूहळू हा सिंड्रोम लोकांना सायटिकासारख्या गंभीर आजाराकडे ढकलतो. याशिवाय नितंब सुन्न होण्याची शक्यताही बळकट होते. याबाबत ऑर्थोपेडिक सर्जनच्या म्हणण्यानुसार, आजकाल अशा प्रकारची समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामध्ये नोकरदार तरुणांची संख्या अधिक आहे.

बैठी कार्यशैली धोक्याची

साधारणपणे एका जागी बराच वेळ बसून काम करणारे लोक जास्त असतात. आता त्याचे पाकीट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवलेले असल्याने त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. या प्रकारची समस्या मुख्यतः विद्यार्थी, बँकर्स, ड्रायव्हर आणि डेस्क कामगारांमध्ये अधिक दिसते. (Lifestyle)

आजार टाळण्यासाठी काय करावे?

हा आजार टाळायचा असेल, तर तुम्हाला तुमचे पाकीट तुमच्या मागच्या खिशात ठेवणे टाळावे लागेल. पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवण्याची सक्ती असेल तर खूप पातळ ठेवण्याचा प्रयत्न करा, असे सांगून डॉक्टरांनी या समस्येवर उपायही सुचवला की, पाकिटात ठेवलेल्या बहुतांश गोष्टी आता मोबाईल मध्ये देखील डिजिटल स्वरूपात ठेवले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT