Health Care esakal
आरोग्य

Health Care : व्यायाम करण्याआधी काय खावे? किती वेळापूर्वी खावे? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

आहार आणि व्यायामाचे नियोजन करूनही काहींना फिटनेस जपता येत नाही

साक्षी राऊत

Health Care : आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करते. पण काही लोकांना आहार आणि व्यायामाचा समतोल कसा राखावा हे माहीत नसते. यामुळे आहार आणि व्यायामाचे नियोजन करूनही काहींना फिटनेस जपता येत नाही.

काही लोक काहीही न खाता व्यायाम करू लागतात. तर काही लोक व्यायाम करण्यापूर्वी पोट भरून खातात. तर काही लोक असे आहेत जे व्यायामानंतर खूप खातात. मात्र काहीही खाल्ल्यानंतर किती वेळाने व्यायाम करावा, याबाबत तुम्हाला माहिती आहे काय? चला तर आज आपण आहार आणि व्यायामामध्ये योग्य अंतर कसे ठेवावे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून जाणून घेऊया.

खाल्ल्यानंतर किती वेळाने व्यायाम करावा?

मेयो क्लिनिकच्या मते, जेवण आणि व्यायाम यामध्ये किमान ३ ते ४ तासांचे अंतर असावे. तसेच मिल आणि व्यायामामध्ये किमान 1 ते 3 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायामापूर्वी जास्त खाल्ले तर तुम्हाला व्यायाम करताना आळस येईल.

पण याचा अर्थ असा नाही की रिकाम्या पोटी व्यायाम करावा. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे जेवण आणि व्यायाम यामध्ये योग्य अंतर ठेवा.

सकाळी व्यायाम करण्याआधी काय खावे?

जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या किमान 1 तास आधी नाश्ता केलेला असावा. सकाळी उठल्यानंतर 1 तासानंतर आपण काहीतरी खावे. त्यामुळे तुम्हाला व्यायामासाठी ऊर्जा मिळेल. जर तुम्ही सकाळी व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर न्याहारीमध्ये प्रोटीन आणि कार्ब्सचा समावेश करा.

होल ग्रेन, फॅटलेस दूध, ज्यूस, केळी आणि दही नाश्त्यात तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर काही हरकत नाही. तुम्ही चहा किंवा एक कप कॉफी पिऊ शकता.

व्यायामानंतर स्नॅक्स खावे की पूर्वी?

व्यायाम आणि जेवण यात जास्त अंतर असेल तर स्नॅक्स हा उत्तम पर्याय आहे. काही लोक व्यायामापूर्वी स्नॅक्स खातात. तर काही लोकांना व्यायामानंतर स्नॅक्स खाणे आवडते. स्नॅक्स कधी खावे हा प्रश्न नसून, तुमच्या शरीराला स्नॅक्सची गरज आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्यापेक्षा हेल्दी स्नॅक्स खाणे चांगले. जर तुम्हाला व्यायामानंतर उर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही स्नॅक्स देखील खाऊ शकता. व्यायामापूर्वी किंवा नंतर आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकतात. जसे की एनर्जी बार, केळी, सफरचंद किंवा ताजे फळ, दही, फ्रूट स्मूदी आणि स्पोर्ट्स ड्रिंक. (Health Care)

व्यायामानंतर किंवा व्यायामापूर्वी किती पाणी प्यावे?

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर पाण्याच्या सेवनाचीही काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायाम करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर पुरेसे पाणी प्यावे. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या मते, व्यायामाच्या 2 ते 3 तास आधी 473 ते 710 मिली पाणी प्यावे.

व्यायाम करताना दर 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे. या दरम्यान 118 ते 237 मिली पाणी पिणे चांगले मानले जाते. त्याच वेळी, व्यायामानंतर सुमारे 473 ते 710 मिली पाणी प्यावे.

परंतु जर तुम्ही 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ व्यायाम करत असाल तर तुम्ही पाण्यासोबत स्पोर्ट्स ड्रिंक्सचे सेवन केले पाहिजे. स्पोर्ट्स ड्रिंक्स प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT