Health Tips  esakal
आरोग्य

Health Tips : काळजी करू नका, काळजी घ्या... Acidity कायमची बरी करा

औषधी चिकित्सा केवळ तात्पुरते लक्षण समाप्ती करू शकते, पण पूर्णपणे सुटका जरा किचकट आहे. पण कायमची बरी करण्यासाठी हे काही उपाय करा.

सकाळ डिजिटल टीम

To Cure Acidity : सध्याच्या जीवनशैलीत ॲसिडीटी हा खूप सामान्य आजार झाला आहे. अवेळी, अपूर्ण झोप, अवेळी जेवण, फास्ट फूड, मसालेदार खाणे, तासंतास बसून काम अशा चुकीच्या जीवनशैलीने हा आजार वाढत आहे.

व्याधींमध्ये अनेक प्रकारची लक्षणे कमी- अधिक तीव्रतेने दिसतात. व्यक्तीपरत्वे ही लक्षणे वेगवेगळ्या रूपात समोर येतात. जसं जसा काळ जाईल तस तशी तीव्रता वाढून अजून काही लक्षणे/ उपद्रव सुरू होतात. त्यामुळे तुमची दिनश्चर्येवर त्याचा वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत यावर औषोधोपचार हा खूप तात्पूरता उपाय होतो. दीर्घकालीन आरामासाठी जाणून घ्या उपाय.

आहारातील आणि विहारातील बदल खूप साधे, सोपे व अतिशय परिणामकारक ठरतात. औषधाची आवश्यकता खूप कमी लागते आणि दैनंदिन जीवनातील सततचा त्रास कमी होतो.

आहारातील उपाययोजना

  • शिळे अन्न खाऊ नये.

  • तूर डाळीच्या ऐवजी मूग डाळीचा वापर करावा.

  • तेल व मसाल्याच्या पदार्थ मसाल्यांचा वापर मर्यादित ठेवावा.

  • चहा कॉफीच्या प्रमाणावर नियंत्रण हवे. उपाशीपोटी चहा कॉफी घेणे टाळावे.

  • सतत बाहेर खाणे टाळून घरगुती जेवणावर भर द्यावा.

  • हिरवी मिरची, गरम मसाले यांचा वापर टाळावा.

  • आंबवलेले पदार्थ सतत खाऊ नयेत. उदाहरणार्थ इडली, ढोकळा इत्यादी.

  • दही (आंबट), आंबट फळे टाळावी.

  • भरपूर प्रमाणात पाणी घ्यावे.

  • चिंचेऐवजी कोकमाचा वापर करावा.

  • साळीच्या लाह्या, राजगिरा लाह्या खाव्यात.

  • काळ्या मनुका, अंजीर रोज खावेत.

  • साळीच्या लाह्यांचे पाणी उपयुक्त आहे.

  • जास्त साखरेचे, मैद्याचे, पॅकेट फूड टाळावे.

  • मिठाचा वापर प्रमाणात असावा.

  • चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी या अवस्थेत जास्त उपयुक्त.

  • उपाशी राहणे/ अतिखाणे टाळावे.

  • मलावष्टंभ (कॉन्स्टिपेशन) टाळावे.

  • पदार्थांबरोबरच तयार करण्याच्या /स्वयंपाकाच्या कृतीमध्ये सुद्धा बदल करावा.

  • सिमला मिरची, पोहे, मेथी इत्यादी पदार्थांचा वापर वैयक्तिक अनुभवाप्रमाणे करावा. पण शक्यतो टाळावे.

विहारातील बदल

  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात.

  • रात्री जेवण खूप उशिरा करणे टाळावे.

  • बैठे काम टाळावे किंवा दर एक तासाने उठून थोड्या हालचाली कराव्यात.

  • रात्रीचे जागरण टाळावे.

  • सकाळी लवकर उठून व्यायामाची सवय ठेवावी.

  • जेवण झाल्या झाल्या झोपू नये.

  • मद्यपान, धूम्रपान टाळावे.

  • वेदनाशामक औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

  • मानसिक ताण व्यवस्थापनासाठी ध्यानधारणा इत्यादीचा अवलंब करावा.

  • हेतू काय आहे हे बघून योजना केल्यास नक्कीच लवकर व कायमचा आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT