gulkand fennel together Esakal
आरोग्य

Health Tips: गुलकंद आणि बडीशेप एकत्र करून सेवन केल्यास होतात असंख्य फायदे...

गुलकंद बाजारात आपल्याला मिळतो. गुलकंदामध्ये व्हिटॅमिन सी, इ, बी हे भरपूर प्रमाणात असते.

सकाळ डिजिटल टीम

गुलकंद बाजारात आपल्याला मिळतो. गुलकंदामध्ये व्हिटॅमिन सी, इ, बी हे भरपूर प्रमाणात असते. बऱ्याच आई व बहिणींना गरोदरपणामध्ये बद्धकोष्टता हा त्रास जाणवतो. तसेच मूळव्याध व उष्णता हा त्रास जाणवतो. त्यासाठी गुलकंद अत्यंत उपयोगी आहे. आजच्या लेखात आपण गुलकंद आणि बडीशेप एकत्र करून सेवन केल्यास कोणते फायदे होतात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गुलकंद आणि बडीशेप सामान्यपणे सगळ्याच्या घरात असते. याच दोन्ही गोष्टी सम प्रमाणात एकत्र करून आपण आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकतो.त्यासाठी आपल्याला 50 ग्राम गुलकंद काचेच्या बाटलीत टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बडीशेप. बडीशेपेमंध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ह्यामुळे आपली प्रतिकारशक्ति वाढते. बऱ्याच व्यक्तींना सवय असते, जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याची, असे केल्यामुळे पोटातील गॅस, अपचन, पित्त ह्याचा त्रास कमी होतो. 

आपल्याला साधारण 50 ग्राम बडीशेप आपल्याला मिक्सरवर एकदम बारीक करून घ्यायची आहे. आता काचेच्या बाटलीत आपल्याला ही बडीशेप पावडर टाकून दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळायचे आहेत. त्यानंतर बरणीचे झाकण लावून टाका. हे मिश्रण आपल्याला उन्हात किंवा सावलीत साधारण 1 महिना ठेवायचे आहे. नंतर हे मिश्रण आपल्याला सेवन करण्यासाठी अगदी योग्य होते.

आता बघू या गुलकंद आणि बडीशेप एकत्र करून हे मिश्रण नेमक कधी खायचं ?

रात्री झोपताना हे मिश्रण मोठ्या व्यक्तींसाठी 20 ग्राम व लहान मुलांसाठी 10 ग्राम जेवण झाल्यावर खायचे आहे. हे खाल्ले कि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे. असे केल्यामुळे शरीरातील वाढलेली उष्णता, गॅस, बद्धकोष्टता नाहीशी होईल. पचनाचे विकार होणार नाहीत.

गुलकंद आणि बडीशेप एकत्र करून खाल्याने काय काय फायदे होतात?

1) तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता, लघवी करताना होणारी जळजळ, पोटात वारंवार तयार होणारा गॅस, पोट गच्च वाटणे, सकाळी पोट साफ न होणे, तसेच शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर त्यापासुन सुटकारा मिळेल.

2) तुमची रोगप्रतिकारशक्ति दुप्पट होईल.

3) जर तुम्हाला सतत विस्मरण होत असेल, सतत तणाव येत असेल, तर ह्या तुमच्या सगळ्या समस्यांवर हा उपाय रामबाण आहे. 

4) हा उपाय केल्या वर तुमचे पचन योग्य पद्धतीने होईल, पोट साफ होंते, ज्यांना मूळव्याध असेल त्यावर पण आराम मिळेल. 

5) तुमचा स्थूलपणा कमी करण्यासाठी हा उपाय एकदम गुणकारी ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT