health tips for monsoon rainy season precautions to stay safe  esakal
आरोग्य

Monsoon Health Care : पावसाळ्यातील आरोग्याची काळजी

पावसाळा सुरू झाला, की सगळीकडे आरोग्याविषयी अनेक समस्या दिसू लागतात. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार वाढलेले

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Health Tips : पावसाळा सुरू झाला, की सगळीकडे आरोग्याविषयी अनेक समस्या दिसू लागतात. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार वाढलेले असतात. पावसाळ्यात वातावरणामध्ये बदल होतो.

हिवताप ः पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे पाण्याची डबकी तयार होतात. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते, या डासांनी दंश केल्याने हिवताप (मलेरिया) या आजाराची लागण होऊ शकते.

सर्दी खोकला ः पावसाळ्यात पावसात भिजणे हे नेहमीचेच असते, त्यामध्ये जास्त वेळा भिजणे आणि अंगावर ओले कपडे असणे यामुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात.

सांधे दुखणे ः पावसाळ्यामध्ये वाताचे आजार वाढलेले दिसून येतात. यामध्ये सांधे दुखणे, पाठदुखी, सांधे जखडणे यासारखे आजार डोके वर काढतात. आमवात, संधिवात असणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये जास्त त्रास होतो.

दमा ः पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे दमा, तसेच श्‍वसनाचे आजार वाढल्याचे दिसून येतात. वातावरणातील दमटपणा, थंड हवा आणि कमी झालेली पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढलेला दिसून येतो.

जुलाब ः पावसाळ्यामध्ये पाण्याचे प्रदूषण जास्त होते, तेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले गेल्याने पचनाचे अनेक त्रास उद्‍भवतात. त्यामध्ये जुलाब (कॉलरा) होण्याची शक्यता असते.

त्वचेचे आजार ः पावसाळ्यामध्ये ओलसर कपडे वापरल्याने, पावसात भिजल्यानंतर ओले कपडे तसेच जास्त वेळ अंगावर राहिल्याने त्वचेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

कोणती काळजी घ्याल?

  • आपल्या जवळील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.

  • डासांची पैदास होऊ नये म्हणून छतावर, टायरमध्ये पाणी साठू देऊ नये.

  • पाणी वापरताना नेहमी गाळून आणि कमीत कमी २० मिनिटे उकळवून प्यावे.

  • पावसाळ्यामध्ये वात दोष वाढलेला असतो. त्यामुळे अंघोळ करताना गरम/कोमट पाण्याचा वापर करावा.

  • पावसाळ्यामध्ये पचन शक्ती मंदावलेली असते, भूक कमी झालेली असते. पचनशक्ती चांगली राहावी यासाठी नेहमी ताजे आणि गरम अन्नाचे आहारात सेवन करावे. आहारात सुंठ/आले याचा वापर करावा.

  • पावसाळ्यामध्ये वातावरण दमट झालेले असते, हवा दूषित झालेली असते, दूषित हवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी सकाळ, संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळ, लिंबाची पाने, सुंठ याचा वापर करून धूप करावा. याने घरातील हवा शुद्ध होण्यास मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT