Black Pepper Benefits esakal
आरोग्य

Black Pepper Benefits: धुम्रपान बंद करते काळी मिरी; वजन कमी करण्यातही उपयोगी!

Black Pepper Benefits: काळी मिरी संजिवनी बुटी प्रमाणेच काम करते

Pooja Karande-Kadam

Black Pepper Benefits : आपल्या किचनमध्ये असंख्य प्रकारचे मसाले असतात. त्या मसाल्यांमुळे जेवणाचा स्वाद तर वाढतोच. पण, ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मसाल्याच्या डब्यातील एक पदार्थ आपल्याला धुम्रपान सोडण्यास मदत करतो. तर त्याने वजनही कमी होतो.

जेव्हा मसाले खरेदीचा विषय येतो तेव्हा काळी मिरी शिवाय ती खरेदी अपुर्णच. चवीला थोडी तिखट असलेली मिरी तुम्हाला अनेक फायदे देते. एखाद्या व्यक्तीला लागलेली धुम्रपानाची सवय, वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करणे, हृदयाशी संबंधित आजारांवर उपयोगी ठरते.

काळी मिरीला आयुर्वेदातही अनन्य साधारण महत्त्व आहे. काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे रसायन असते. या रसायनाचे शरीरावर अनेक परिणाम होत असल्याचे दिसते.

हे वेदना कमी करते, श्वासोच्छवास सुधारते आणि जळजळ कमी करते असे दिसते. पाइपरिन देखील मेंदूचे कार्य सुधारत असल्याचे दिसते, परंतु कसे ते स्पष्ट नाही.

काळ्या मिरीला जगातील ठिकाणा आणी प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आहेत. याला तेलुगुमध्ये नाला मिरियालू, तमिळमध्ये करुमिलाकू आणि कन्नडमध्ये करे मनसु असेही म्हणतात.

येथे आम्ही आपल्याला सांगत आहे की काळी मिरी ही फुलांची वेल आहे, जीची शेती तिच्या फळासाठी लागवड केली जाते. वैज्ञानिकदृष्ट्या याला पायपर निग्रम म्हणतात.या वेलीचे फळ सुकल्यावर त्याचा मसाला म्हणून वापर केला जातो. या मसाल्याला काळी मिरी म्हणतात.

काळी मिरीचे फायदे

आहारात काळी मिरी वापरल्याने पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते. काळी मिरीमध्ये आढळणारे पाइपरिन स्वादुपिंडाच्या पाचक एंजाइमांना उत्तेजित करून पचन क्षमता वाढविण्यात मदत करू शकते.

काळी मिरी स्वादुपिंडाच्या लिपेस, काइमोट्रिप्सिन आणि एमिलेज च्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देऊ शकते. हे सर्व पाचक एंजाइम म्हणून ओळखले जातात.

तोंडासाठी उपयोगी

काळी मिरी खाल्ल्याने तोंडाच्या आरोग्यावरही फायदा होतो. या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की त्यात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

यामुळे तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि तोंडाची स्वच्छता राखण्यास मदत होते. तसेच दाहक-विरोधी गुणधर्म हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

काळी मिरी खाल्ल्याने तोंडाच्या आरोग्यावरही फायदा

वजन कमी होते

काळी मिरी खाण्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी देखील असू शकतात. या संदर्भात केलेल्या एका वैद्यकीय संशोधनादरम्यान काळी मिरी असलेले पदार्थ काही आठवडे खाल्ले गेले. यामध्ये असे आढळुन आले कि भूकेत कोणताही बदल न होता शरीरातील चरबी आणि लिपिडची पातळी कमी झाली. यामुळे शरीराचे वजन काही प्रमाणात कमी होऊ शकते असे दिुसुन आले.

मधुमेहावर गुणकारी

काळी मिरी खाण्याचे फायदे मधुमेह आणि रक्तातील साखर सामान्य ठेवण्यासाठी होऊ शकतात. एका वैज्ञानिक संशोधनानुसार, काळी मिरीमध्ये अँटीहायपरग्लाइसेमिक घटक असतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करते. यामुळे मधुमेहाच्या उपचारात मदत होऊ शकते.

धुम्रपान सोडवण्याचे औषध

ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे त्यांच्यासाठी काळी मिरी वापरणे उपयुक्त ठरू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की काळी मिरी पावडर श्वासाने घेतल्याने धूम्रपान करण्याची तीव्र इच्छा हळूहळू नियंत्रित केली जाऊ शकते. या संदर्भात अजून वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT