Health Tips  esakal
आरोग्य

Health Tips : भारतातल्या वाढणाऱ्या गंभीर आजारावर कारलं, लिंब अन् जांभूळ ठरतंय गुणकारी!

भारतात आता येणार या गंभीर आजाराची साथ, तज्ज्ञांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

Home Remedies For Diabetes : जगभरात दोन वर्षाआधी कोविड-19 ने धुमाकूळ घातला होता. त्यावर लसी शोधून हा आजार थांबवण्यात यश आले आहे. पण, अनेक आरोग्य तज्ज्ञांनी क्रॉनिक डिजीज ही येणाऱ्या काळातील महामारी असणार आहे. त्याचे मुख्य लक्षण हे मधुमेह असेल,असेही तज्ज्ञांनी सांगितले.

इतर आजारांमध्ये मधुमेह हा सर्वात वाईट आजार आहे. कारण जगभरात मेटाबॉलिजमशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. जगासाठी हा एक नवीन धोका आहे. त्यामूळे आताच हा आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे.(Health)

मधुमेहासारखा गंभीर आजार तुम्ही रोज काय खाता यावर अवलंबून असतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणातील पदार्थांवर या सर्व गोष्टी मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

तुम्हाला खालीलपैकी कोणतीही मधुमेहाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • धूसर दृष्टी

  • तहान वाढली

  • हात किंवा पाय मध्ये सुन्नता

  • अशक्त, थकल्यासारखी भावना

  • अनियोजित वजन कमी होणे

  • सुक्या तोंड

  • वारंवार मूत्रविसर्जन

  • वारंवार अस्पष्ट संक्रमण

  • हळू-बरे होणारे फोड किंवा कट

नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप, कमी पौष्टिक पदार्थ, काही पोषक तत्वं असलेले पदार्थ, औषधी वनस्पतींनी मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. चला अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा आहारात समावेश करून मधुमेहावर कंट्रोल करता येते.  

कडुनिंबाची पाने :

कडुनिंबाची पाने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगला उपाय आहेत. कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, अँटीव्हायरल  आणि ग्लायकोसाइड्स घटक असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

कसा वापर कराल

कडुलिंबाची पावडर बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने वाळवून ठेवा. या कोरड्या पानांची बारीक पावडर बनवून घ्या. मधुमेह लवकर बरा व्हावा यासाठी दिवसातून दोन वेळा या पावडरचे ग्लासभर पाण्यात टाकून सेवन करा.

कारल्याचा ज्यूस (Bitter Gourd Juice) : कारलं म्हणलं की अनेकांच्या तोंडाचं पाणीच पळून जातं. पण, काही हौशी मंडळी मात्र रोज कारल्याचं सेवन करतात. कारण, त्यांना फिट रहायचं असतं. तर तूम्हालाही मधुमेहापासून सुट्टी हवी असेल तर कारल्याच्या रसाच सेवन करा.   कारण, कारल्यामध्ये चेराटिन आणि मोमोर्डिसिन हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आढळतात. ज्यात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असते. कारल्याचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.   जर तूम्हाला कारल्याचा ज्यूस आवडत नसेल तर तूम्ही त्याची भाजीही खाऊ शकता. किंवा फ्राय केलेलं कारलंही बाजारात मिळतं. तूम्ही त्याचाही डायटमध्ये समावेश करू शकता.  

जांभूळ :

तूम्हाला थोडी चव असलेला पदार्थ खाऊन मधुमेह कमी करायचा असेल तर तूम्ही ढिगभर जांभळं खा. कारण जांभुळ हे हायपोग्लाइसेमिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. एका ग्लास पाण्यात एक चमचा जांभूळ किंवा त्याच्या बियांची पावडर घाला. चांगले मिसळा आणि दररोज रिकाम्या पोटी प्या.

आले:

दररोज आल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित होते. एका भांड्यात एक कप पाणी आणि आले टाकून चांगले उकळवा. पाच मिनिटे उकळल्यानंतर आले वेगळे करा. दिवसातून एक किंवा दोनदा याचे सेवन करा.

हे पदार्थही करतील मदत

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे मधुमेहाच्या व्यक्तीने काकडी, टोमॅटो, दुधी भोपळा, पालक, मेथी, कोबी यांसारख्या भाज्यांचा समावेश आहारात करणं गरजेचं असते. या गोष्टीमुळे तुमचा मधुमेह प्रमाणात राहण्यास मदत होईल.

मधुमेहात हे खाऊ नका

आहारामध्ये बटाटा, रताळे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात त्याच प्रमाणे फळांमध्ये आंबा, केळी, लिची, द्राक्षे यांसारखी जास्त साखर असलेली फळे कमी खा. बदाम, अक्रोड, अंजीर असे ड्रायफ्रुट्स खा. पण मनुका, बेदाणे, खजूर यांचे सेवन करू नये.

मधुमेह असताना चहा घेऊ शकता का

भारतीय लोकांसाठी चहा म्हणजे अमृतच. पण, मधुमेहाच्या लोकांसाठी तो विषच मानला जातो. मधुमेह वाढण्यासाठी चहा कारणीभूत ठरतो. त्यामूळेच डॉक्टर चहा पिऊ नका असे सांगतात. पण, मधुमेह असेल तर तूम्ही चहा घेऊ शकता. फक्त तो चहा वेगळा असतो. तूम्ही शुगर फ्री चहा घेऊ शकता. किंवा साखर कमी घालून चहात दालचिनी घालू शकता. असा दाचलिनीचा चहा तूम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता.

मधुमेहाचे पेशंट असाल तर काय करावे काय नाही

  • संतुलित आहार घ्या 

  • त्वचाविरहित चिकन, मासे, राजमा, मूग आणि सोयाबीनची निवड करा

  • ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेला आहार घ्या   

  • जास्त प्रमाणात गव्हाची ब्रेड आणि रोटी, ब्राऊन राइस आणि ओट्स खा

हे करू नका

  • जेवण टाळू नका

  • प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मांस खाणे बंद करा

  • रिकाम्या किंवा भरलेल्या पोटावर व्यायाम करू नका

  • तुमची औषधे चुकवू नका

  • मेंदू तणाव विरहीत ठेवा

  • कमी फायबर असलेले दही, दूध आणि पनीर खाऊ नका      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT