Health Tips esakal
आरोग्य

 Health Tips : पोट साफ न होण्यास कारणीभूत ठरतात हे पदार्थ, आजपासूनच खाणं बंद करा!

या पदार्थांमुळे पोट साफ होत नाहीय?

Pooja Karande-Kadam

Health Tips : डिहायड्रेशन ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. याची कारणेही अगदी साधी आहेत. लोकांच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक स्थुलता ही पचन क्रियेतील समस्यांमागील सर्वात मोठी कारणे आहेत. गॅस आणि अपचनासोबतच बद्धकोष्ठतेच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

तूम्हालाही बद्धकोष्ठता त्रास नियमितपणे होत असेल. तर ते पाचन तंत्रासाठी खूप हानिकारक असू शकते. यामुळे तुम्ही कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलवर परिणाम होऊ शकतो. याची अनेक कारणे आहेत.

पण, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हानिकारक अन्नपदार्थांचे सेवन होय. नियमित आहारात काही पदार्थ वापरले जातात जे अन्न बद्धकोष्ठता निर्माण करतात जे बद्धकोष्ठता वाढवतात.

दुध आणि दुधाचे पदार्थ

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे बद्धकोष्ठता वाढविणारे पदार्थ आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या सर्व्हेनुसार, मुलांना बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. कारण लहान मुलांची पचनसंस्था गाईच्या दुधात असलेली प्रथिने पचवण्यास पूर्णपणे सक्षम नसते. या संदर्भातच 13 मुलांवर एक अभ्यास केला गेला. ज्यामध्ये त्यांना गायीच्या दूधा ऐवजी सोयाचे दुध देण्यात आले. या बदलानंतर 13 पैकी 9 मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होणे कमी झाले.

व्हाईट ब्रेड

व्हाईट ब्रेडचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे शौच कोरडे आणि कडक होते. त्यामुळे पोट साफ होण्यास त्रास होतो. ते बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मैद्यात फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. हे पचनासाठी चांगले नाही.

व्हाईट ब्रेड

रेड मीट

रेड मीटमध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. जे तुमचे मन एका जागी गोळा करते. अशावेळी बद्धकोष्ठतेचा धोका असतो. जर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि तृणधान्ये याऐवजी मांस खाल्ले तर तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

रेड मीट

ग्लूटेनयुक्त पदार्थ

ग्लूटेन हे गहू, सातू, राई अशा धान्यात असलेले एक प्रकारचे प्रथिने आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, ग्लूटेनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. काही लोकांच्या मते ग्लूटेन उष्ण असते. ग्लूटेनयुक्त पदार्थांचे सेवन केले तर त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो.

गव्हात जास्त प्रमाणात ग्लुटेन असतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

Women’s World Cup 2025: 'शेफाली वर्माला महिला संघातून वगळले'; विश्‍वकरंडकासाठी भारताचा संघ जाहीर, रेणुका सिंगचा समावेश

Mata Lakshmi: माता लक्ष्मी रात्री 'या' ठिकाणी करते भ्रमण, वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT