Symptoms Of Psoriatic Arthritis: sakal
आरोग्य

Arthritis Symptoms: तुमच्याही हातापायांची बोटे वाकडी झालीयेत का? या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Symptoms Of Psoriatic Arthritis: सोरायटिक संधिवात हा एक ऑटो-इम्यून रोग आहे, ज्यामध्ये पायाची बोटे चित्रविचित्र पद्धतीने वाकडी होतात आणि शरीरामध्येही ही लक्षणे आढळतात.

सकाळ डिजिटल टीम

Psoriatic Arthritis News कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर किंवा लागण होण्यापूर्वी आपले शरीर वेळोवेळी याबाबतचे संकेत आपल्याला देत असते. या संकेतांकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले तर त्यावर वेळीच औषधोपचार करून संबंधित आजारावर नक्कीच मात केली जाऊ शकते. 

असाच एक आजार म्हणजे ‘सोरायटिक आर्थरायटिस’.  या आजारामध्ये हात व पायांची बोटे चित्रविचित्र पद्धतीने वाकडी होण्यास सुरुवात होते. धक्कादायक बाब म्हणजे या आजारात सोरायसिस आणि संधिवात अशा दोन्ही आजारांची लक्षणे दिसतात. 

म्हणजे सांधे व त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. पण योग्य ते औषधोपचार करून आपण सोरायटिक आर्थरायटिस आजारावर नक्की मात करू शकता. जाणून घेऊया सोरायटिक संधिवात आजार व त्याच्या लक्षणांबद्दलची माहिती…

सोरायटिक संधिवात म्हणजे काय? 

सोरायटिक संधिवात हा एक ऑटो इम्यून रोग आहे. या आजारामध्ये शरीरावर लाल पुरळ किंवा त्वचेवरील मृत पेशींची खपली निघाल्यासारखे डाग दिसतात आणि अशा स्थितीत सांधेदुखी, हात-पाय दुखणे, सूज येणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. 

साधारणतः या आजारात हात व पायांची बोटे विचित्र पद्धतीने वाकडी होऊ लागतात.  30 ते 50 वयोगटातील व्यक्तींमध्ये हा आजार अधिकतर पाहायला मिळतो. क्वचितच एखाद्या विशेष प्रकरणात लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणे आढळून येतात.  

काय आहेत या आजाराची लक्षणे?

  • दीर्घकाळ थकवा जाणवणे

  • पाय सूजणे व पायांची बोटे सूजणे  

  • सांधे कडक होणे, सांधे दुखणे व सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे

  • सकाळी झोपेतून उठल्यानंतर अधिक थकवा जाणवणे

  • नखांवर लाल रंगाचे डाग दिसणे किंवा नखे निळी पडणे  

  • डोळे लाल होणे 

सोरायटिक संधिवात या आजारापासून कसे संरक्षण करावे?  

सोरायटिक संधिवात हा आजार अनुवांशिक किंवा हवामानामध्ये वारंवार होणाऱ्या बदलामुळेही होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

या आजाराची लागण होऊ नये; यासाठी नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे व पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसंच या आजाराची लक्षणे शरीरामध्ये आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.  

  • हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा

  • नियमित व्यायाम करा

  • ताणतणावापासून दूर राहा

  • शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा 

  • अंमली पदार्थांचे सेवन करणं टाळा

  • हात व पायांना गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने शेक द्यावा 

  • चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित स्वरुपात करावे   

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT