Health Care
Health Care esakal
आरोग्य

Health Care : संतुलित आहारासाठी फायदेशीर आहेत कार्बोहायड्रेट्स, ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, अतिशय आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींची जर योग्य प्रकारे सांगड घातली तर, तुमचे आरोग्य निरोगी राहिल, यात काही शंका नाही. संतुलित आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा योग्य प्रकारे समावेश असणे हे फार महत्वाचे आहे.

कर्बोदकांचा (कार्बोहायड्रेट्स) आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय, आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी कर्बोदके अतिशय फायदेशीर आहेत. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात.

केळी

केळी खायला सर्वांनाच आवडते. या केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशिअमचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. आपल्या शरीराला योग्य प्रकारे खनिजे पुरवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

केळीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे केळ्यांमध्ये आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे तुमची पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे, संतुलित आहारासाठी केळ्यांचा आहारात जरूर समावेश करावा.

रताळे

रताळ्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. कारण, रताळ्यांमध्ये कर्बोदके आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणून रताळ्याला ओळखले जाते.

यासोबतच विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी रताळे मदत करते. रताळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. संतुलित आहारासाठी तुम्ही रताळ्यांचा आहारात जरूर समावेश करावा.

ओट्स

ओट्समध्ये विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश असतो. या विविध प्रकारच्या धान्यांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. हे पोषकघटक आपल्या शरीरातील जीवनसत्वांची, खनिजांची, कर्बोदकांची आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते.

यासोबतच या ओट्सचे सेवन केल्याने आपल्या शरीराला फायबर्स आणि प्रथिनांचाही योग्य प्रकारे पुरवठा होतो. ओट्से सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, ओट्सचा तुमच्या आहारात जरूर समावेश करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT