Fruits in Winter Season
Fruits in Winter Season sakal
आरोग्य

Fruits in Winter Season: हिवाळ्यात 'ही' पाच फळे तुम्ही खायलाच हवी!

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा म्हटलं की थंडी आणि त्यात सर्दी खोकला. या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. विशेषत: हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे. कारण फळांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

अनेकजणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खाणारी काही खास फळे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Fruits in Winter Season)

सफरचंद- सफरचंद खरं तर बाराही महिने मार्केटमध्ये असते पण त्याचा खरा हंगाम हा हिवाळ्यात असतो. असं म्हणतात की दररोजचे एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. हे खरंय आहे. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यातील फायबर, व्हिटीमिन्स C आणि K आपल्या शरिराला मुबलक उर्जा देतात.

पेरू- पेरू हा खरं तर हिवाळ्यात येतात. सर्दीमुळे अनेकजण पेरू खाणे टाळतात पण पेरुमध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शक्यतो पेरू खावेत.

डाळिंब- थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम असतं. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता तर दूर होतेच सोबतच वजन कमी करण्यासही डाळींब महत्त्वाची भूमिका बजावतो.

गाजर - हिवाळ्यात गाजर आवश्यकच आहे. हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. गाजरमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

आवळा

आवळा हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ आहे. आवळ्याचा रस दररोज पिल्याने केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. लिव्हरसाठीही आवळा खूप फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT