Heart Care
Heart Care esakal
आरोग्य

Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

सकाळ डिजिटल टीम

Heart Care : कार्डिओथोरॅसिक सर्जनच्या निरीरक्षणानुसार, सध्या हार्ट अटॅकचा धोका होणारे व्यक्ती हे वयोवृद्ध किंवा डायबीटीस असणारे पेशंट नाहीयेत, ना ते व्यसनाधीन लोकं आहेत, खरंतर ते रोज वर्कआऊट करणारे, फिजिकली फिट असणारे तरुण आहेत.

या रुग्णांमध्ये कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसतांनाही अशा केसेस दिसता आहेत आणि खरंतर ही खूप भयानक गोष्ट आहे. कारण मुळात फिजिकली फिट असणाऱ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि आपल्या रेग्युलर शेड्यूलमुळे त्यांना लवकर कोणताही आजार होत नाही.

अनेकजण प्रोटीन शेक, एनर्जी बार किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्सच सेवन करतात, या प्रोडक्टस्ची संज्ञा हेल्थलाइन डॉट कॉमने “मल्टी-इन्ग्रिडियंट डायटरी फॉर्म्युला” अशी केली आहे. अनेक फिटनेस प्रेमी, आपल्या वर्कआऊट मध्ये भरपूर एनर्जी मिळावी यासाठी या प्रॉडक्टस्चा वापर करतात.

अशा सप्लिमेंट्समध्ये अमीनो अॅसिड, बी व्हिटॅमिन, कॅफीन, क्रिएटिन आणि आर्टिफिशियल स्वीटर्ससह विविध घटक असतात, जे आपल्या शरीरातली एनर्जी वाढवायला मदत करतात. या प्री-वर्कआउट सप्लिमेंट्समध्ये प्रायमरी लेवलवर सर्वात जास्त कॅफेन आढळते.

अनेक प्री-वर्कआउट सप्लिमेंट्समध्ये या कॅफेनची पातळी तब्बल 200 मिलीग्रामपेक्षा जास्त आहे. हे प्रमाण जवळजवळ 2 कप कॉफीएवढ आहे. एनर्जी लेवेल सुधारण्यासाठी कॅफेन हा एक उत्तम पर्याय आहे.

पण अशा हाय कॅफेनयुक्त ड्रिंक्समुळे आपल्याला धडधडणे, अतिसार, हाय बीपी, मळमळ, डिप्रेशन आणि हृदयाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. याला एट्रिअल फायब्रिलेशन म्हणतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात.

अनेक प्री-वर्कआउट सप्लिमेंट्समधला आणखी एक घटक म्हणजे क्रिएटिन आणि याच्या अति सेवनाने ब्लोटींग, पचन समस्या आणि वजन अचानक वाढणे अशा गोष्टी होतात, ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. याव्यतिरिक्त, टेस्ट वाढवण्यासाठी प्री-वर्कआउट सप्लिमेंट्समध्ये कृत्रिम स्वीटनर्स सुद्धा असतात. याने डायबीटीसचा सुद्धा त्रास होऊ शकतो.

प्री-वर्कआउट सप्लिमेंट्स बद्दल नक्की काय म्हणतात FDA?

FDA ने या प्री-वर्कआउट सप्लिमेंट्सचे काटेकोरपणे चेक केलेल नाही. त्यांच्यामते अशी अशी उत्पादने थोड्याशा काळात फिटनेस देतात पण याचे आपल्या आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम दिसू शकतात. व्यायामापूर्वी त्यांचे सेवन केल्याने आपल्या शारीरिक हालचालीसोबत हृदय व रक्तवाहिन्यांच्या एकूण कामाच्या गतीतही बदल होऊ शकतो. जे हानिकारक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT