Heat Wave  esakal
आरोग्य

Heat Wave : सगळीकडे उष्णतेची लाट! सावध राहा, नाहीतर...डॉक्टरांचे सल्ले लक्षात घ्या

उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, तेव्हा सावध राहा

सकाळ डिजिटल टीम

उष्णतेची लाट : सावध राहा

उपराजधानीत उष्णतेची लाट आली आहे. पारा ४३ अंश सेल्सियस जवळ पोहोचला आहे. ही लाट सगळ्यांसाठी मोठा अलर्ट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे या काळात निष्काळजीपणा बाळगणे जीवावर बेतणारे ठरू शकते. चेहरा आणि डोके दीर्घकाळ थेट हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यास सनस्ट्रोक अर्थात उष्माघाताची शक्यता आहे. यामुळे उष्णतेच्या उष्ण वाऱ्यापासून सावध राहावे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेले हे सल्ले लक्षात घ्यावे.

सनस्ट्रोकची भीती

उष्ण वारे : उन्हाळ्यात उष्ण वारे वाहतात त्याला लू म्हणतात. एप्रिल ते जून या तीन महिन्यात पारा खूप जास्त असतो. खूप उष्ण आणि कोरडे वारे वाहतात.

उष्माघात : तापमान खूप जास्त असताना चेहरा आणि डोके दीर्घकाळ हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास सनस्ट्रोकची भीती असते. तेव्हा खालील काही मुद्दे लक्षात घ्या.

हे लक्षात ठेवा…

थंड हवामान व वातानुकूलित खोलीतून थेट सूर्यप्रकाशात, संपर्कात येऊ नये

अनेक तास उष्ण वारा आणि सूर्यप्रकाशात राहू नये

कडक उन्हाळ्यात खुप व्यायामही नको

शरीराला गरजेपेक्षा कमी पाणी पिऊ नये

सुती कापडांचा वापर करावा

उष्ण वातावरणात मद्यपान टाळावे (Temperature)

हे संकेत दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जावे

  • शरीराचे तापमान सुमारे १०१ वर गेल्यास शरीर गरम आणि लाल होण्याचे संकेत देते

  • पाणी पिऊनही पुन्हा पुन्हा तहान लागते

  • त्वचा कोरडी पडू लागल्यास उलट्या होतात.

  • जुलाब सुरू झाल्यास अशक्तपणा आणि थकवा जाणवला तर

  • डोकेदुखी आणि चक्कर येत असतील तर

  • हृदयाचे ठोके वाढण्याची शंका आल्यास

  • श्वासोच्छ्वास जलदगतीने सुरू झाल्यास (Summer)

उष्णतेची सर्वाधिक जोखीम मुले, वृद्ध तसेच रुग्णांना आहे. त्याचप्रमाणे कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये. ऊन लागल्यास थंड आणि सावलीच्या ठिकाणी व्यक्तीला ठेवावे. उष्माघाताचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी खूप कमी होते किंवा थांबते. तेव्हा वरील संकेत दिसल्यास सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

-डॉ. एम. एम. बोरकर,

वैद्यकीय अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT