Heat Wave
Heat Wave esakal
आरोग्य

Heat Wave : सावधान, आजपासून नऊ दिवस ‘नवतपा’ भाजून काढणार

सकाळ डिजिटल टीम

उन्हात घराबाहेर पडणे धोक्याचे : विदर्भाचा पारा ४६ अंशापार जाण्याची शक्यता

Heat Wave : उन्हाच्या तीव्र चटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला ‘नवतपा’ गुरूवारपासून सुरू होत आहे. नवतपाच्या नऊ दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार असून, विदर्भातील पारा ४६ अंशापार जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या काळात भर दुपारी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. या दिवसांमध्ये दिवस मोठा व १३ तासांचा असतो. त्यामुळे सूर्यापासून येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहाते. सूर्य पृथ्वीच्या खूप जवळ येत असल्याने उन्हाचे चटके अधिकच जाणवतात. कमाल तापमानात मोठी वाढ होते. या दिवसांमध्ये सर्वच राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवते.

लहान मुले व ज्येष्ठांची काळजी घ्या

उन्हाच्या दाहकतचा तब्येतीवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे नवतपाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही वैदर्भींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या नऊ दिवसांमध्ये कडक ऊन तापत असल्यामुळे प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. सवयी, राहणीमान, खानपान या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, पारा भडकल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपूर व विदर्भात उष्माघाताचे रुग्ण व मृत्यू झपाट्याने वाढत आहेत.

सर्वांनीच अलर्ट राहण्याची गरज

यावेळीही विदर्भात कडक ऊन राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. नवतपामध्ये पाऱ्याने अनेकवेळा विक्रमी उसळी घेतल्याचे वैदर्भींनी यापूर्वी अनुभवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रादेशिक हवामान विभागानेही आगामी काळात विदर्भातील ढगाळ वातावरणासोबतच पारा ४५-४६ अंशांवर जाण्याचे यापूर्वीच संकेत दिले आहे. त्यामुळे लहानथोरांसह सर्वांनाच नवतपामध्ये अलर्ट राहण्याची गरज आहे. (heat wave)

या दाहकतेपासून बचावासाठी काय कराल?

  • या दिवसांमध्ये सहसा हलका नाश्ता करूनच घराबाहेर पडावे

  • शक्यतो भर उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळेत फिरणे टाळावे

  • सोबत नेहमी पाण्याची बॉटल व कांदा ठेवावा

  • दिवसभर अधूनमधून भरपूर पाणी प्यावे

  • फळांचा रस, लिंबू-पाणी, ताक, लस्सी, आंब्याचे पन्हे इत्यादींचे सेवन करावे

  • बाहेर पडताना दुपट्टा, स्कॉर्प, टोपी व गॉगलचा वापर करावा

  • शक्यतो घाम सोकून घेणारे पांढरे सुती, सैल व नरम कपडे घालावे

  • ऊन लागल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Summer)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT