Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : आजारतून सुटका करण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा जेवणात करा तांब्या- पितळच्या भांड्याचा समावेश

घराच्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडी देखील आरोग्यावर खूप प्रभाव दाखवतात

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : घराच्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडी देखील तुमच्या आरोग्यावर खूप प्रभाव दाखवतात. तुम्ही कोणत्या भांड्यात जेवतात, याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी असतो. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहारा बरोबरच आपण कोणत्या धातूच्या भांड्यात ते अन्नपदार्थ शिकवतो आहोत आणि खातो आहोत हे महत्त्वाचं असतं.

भारतातील बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये स्टील, अॅल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, लोखंडी भांडी वापरली जातात. पूर्वी खेड्यापाड्यात लोक लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात अन्न शिजवायचे. आपण अनेकदा ऐतिहासिक सीरिअल्स मध्ये, मूव्हीज मध्ये तसेच ऐतिहासिक वास्तू प्रदर्शनात बघतो की तेव्हाची लोकं तांब्या आणि पितळाची भांडी वापरायची.. पण अस का? याच कारण तेव्हा स्टील नव्हत असा काहींचा समज आहे पण त्याच शास्त्रोक्त कारण वेगळं आहे.

पितळाच्या आणि तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्याने फायदा होतो

1. बहुतेक लोक स्टीलच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतात, त्यामुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसची बचत होते. स्टीलच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यानंतर त्यात केवळ 60 ते 70 टक्के पोषक तत्व उरतात. क्रोमियम किंवा निकेलने पॉलिश केलेली स्टेनलेस स्टीलची भांडी खरेदी करणे टाळावे असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात.

2. स्वयंपाकासाठी आणि जेवण्यासाठी पितळेची भांडी वापरल्यास अन्नातील 90 टक्के पोषक तत्वे जतन केली जातात. पितळाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना आम्लयुक्त किंवा सायट्रिक अन्न टाळावे. कारण असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

3. तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्याने श्वसनासंबंधी आजारांचा धोका कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचा त्रासही कमी होतो. यातील अन्न खाल्ल्याने शरीरातील झिंकचे प्रमाण वाढते आणि रक्त शुद्ध होते. यासोबतच हे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.

4. पितळाच्या आणि तांब्याच्या भांड्यात अन्न ठेवल्याने अन्न दीर्घकाळ गरम राहते. त्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो. ते खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी उजळते आणि त्वचेसाठीही ते फायदेशीर आहे.

Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. सकाळ माध्यम समूह याचे समर्थन करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT