Leg Swelling  sakal
आरोग्य

Leg Swelling : तुमचेही दररोज पाय सुजतात? औषधी घेण्यापूर्वी एकदा 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Leg Swelling : पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही.

अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय पूर्ववत होऊ दे. अशा स्थितीत कधी कधी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा शक्य होत नाही किंवा डॉक्टर कधी कधी उपलब्ध नसतात. अशी वेळ आल्यास काय करावे? (Home remedies to reduce Leg Swelling try these tips )

तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता. तुम्हाला पायाची सूज कमी करू शकतील असे काही लाभदायक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करून पायाच्या सुजेपासून आराम मिळवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार!

जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्‍नीशियम सल्‍फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे.

रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्‍नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.

कोणत्याही अवयवावर सूज आली किंवा अवयव दुखू लागला, वेदना होऊ लागल्या तर एक सगळ्यात सोप्पा पर्याय आपण वापरून पाहतो तो म्हणजे एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा.

बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते. डॉ

क्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून हे उपाय वापरून पहा, जर या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र तुम्ही शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ अमित भोरकर

आहारतज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT