how much calories in one chapati Esakal
आरोग्य

1 Chapati Calories: गव्हाच्या चपातीत किती Calories ? एक चपाती जरी जास्त खाल तर करावी लागेल ‘इतकी’ मेहनत

How much calories in one chapati?: साधारणत: एका पुरुषाला दिवसभरासाठी २००० कॅलरीज गरजेच्या असतात. यासाठीच आपण एका चपातीत किती कॅलरी असतात आणि चपाती खाणं कसं फायदेखील ठरू शकतं हे पाहुयात.

Kirti Wadkar

भारतातील अनेक घरांमध्ये जेवणामध्ये चपाती हा पदार्थ महत्वाचा घटक आहे. चपातीशिवाय अनेक घरांमध्ये जेवण अपूर्ण आहे. अनेक जणांना अगदी सकाळचा नाश्ता Breakfast असो किंवा दुपारचं आणि रात्रीचं जेवण Meal तिन्ही वेळा ताटात चपाती हवी असते. How Much Calories one chapati Gives Marathi Health Hacks

गव्हाच्या चपातीमध्ये Chapati अनेक पोषक तत्व आहेत जी शरीरासाठी आवश्यक असतात. मात्र अलिकडे जास्त चपाती खाल्लाने देखील वजन Weight वाढतं असा अनेकांचा समज होवू लागला आहे. खरं तर गव्हाची चपाती ही शरीरासाठी आरोग्यदायी आहे.

यामध्ये झिंक, आयरन, मॅग्नेशियम, सल्फऱ आणि कॉपर मुबलक प्रमाणात आढळतं. ही सर्व पोषक तत्व शरीरासाठी गरजेची असतात. असं असलं तरी चपाती खाल्ल्याने वजन वाढू शकतं असा अनेकांचा समज असतो. खरं तर हा एक मोठा गैरसमज आहे. 

तुम्ही जेवणात किती चपात्या खाता त्याचसोबत ती कशी म्हणजेच साधी की तूप Ghee लावून खात आहात हे महत्वाचं आहे.

साधारणत: एका पुरुषाला दिवसभरासाठी २००० कॅलरीज Calories गरजेच्या असतात. यासाठीच आपण एका चपातीत किती कॅलरी असतात आणि चपाती खाणं कसं फायदेखील ठरू शकतं हे पाहुयात. 

हे देखिल वाचा-

एका चपातीमध्ये किती कॅलरी- 

प्रत्येक घरामध्ये चपातीचा आकार वेगळा असतो. १०० गव्हाच्या पिठामध्ये ३८० कॅलरी असतात. समजा २५ ग्रॅम पीठाची एक चपाती केली तर त्यात ९५ ते १०० कॅलरीज असतात. मात्र जर तुम्ही या चपातीला तूप लावून खात असाल तर अर्थातच कॅलरीज वाढतील.

समजा तुम्ही त्यावर अर्धा चमचा म्हणजेच साधारण ५-६ ग्रॅम तुप घेत असाल तर ६० कॅलरी आणखी वाढतील.  म्हणजेच तुपाच्या चपातीत साधारण १६० कॅलरीज असतात असं म्हणावं लागेल? Wheat chapatti calories 

२४ तासामध्ये किती चपाती खाव्या?

तज्ञांच्यामते एका व्यक्तीला दररोज २५० ग्रॅम कार्ब्सचं सेवन करणं गरजेचं आहे. म्हणजेत तुम्ही रोजच्या आहाराच ७५ चपातीचं सेवन करू शकता. म्हणजेच तुम्ही दिवसभरात ३-४ चपातीचं सेवन करू शकता. तसचं चपातीच्या आकारावर देखील हे अवलंबून आहे. साधारण ४ इंच मोठी आणि १ इंच जाड चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो.

जर याहून मोठी चपाती खात असाल तर अर्थात कॅलरीजचं प्रमाण वाढेल. त्यामुळेच जर तुम्हाला जास्त चपाती खायची असेल तर तुम्हाला दिवसभरात इतर कॅलरीज जसं की भात, ब्रेड, बिस्किटं अशा पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल. 

नियमित व्यायाम करणं हे शरीरासाठी गरजेचं असतं. खास कपरून जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला दिवसभरात तुम्ही किती कॅलरीजचं सेवन करत आहात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात चपाती खात असाल तर सहाजिकच तुमचं वजन वाढू शकतं. यामुळेच जर तुम्ही एक चपाती जरी जास्त खात असाल तर तुम्हाला जादा कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त वर्कआउट करावा लागेल. 

  • १ चपाती जास्त खाल्ल्यास तुम्हाला ३१ मिनिटांसाठी ६ किलोमीटर प्रतितास गतीने जलद चालावं लागेल.

  • हवं तर तुम्ही १० मिनिटं मात्र ११ किलोमिटर ताशी वेगाने पळू शकता. 

  • शिवाय त्याएवजी तुम्ही १४ मिनिटं सायकल चालवू शकता.

  • तसचं १८ मिनिटांसाठी पोहू शकता.

यावरून एक चपाती जास्त खाल्ल्याने कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

PKL 12: प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाला 'या' दिवशी होणार सुरूवात! १२ संघांमध्ये पुन्हा रंगणार थरार

Latest Maharashtra News Live Updates: 'राजद'च्या दबावाखाली, काँग्रेसने पप्पू यादव अन् कन्हैया कुमारचा जाहीर अपमान केला - संजय निरुपम

Hemlata Thackeray: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

Guru Purnima : गुरु नसेल तर गुरु पौर्णिमेला कुणाची करावी पूजा? ; शास्त्र काय सांगते, जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT