Kidney Failure Treatment sakal
आरोग्य

Kidney Failure Treatment: किडनी फेल्युअरवर कोणता उपचार आहे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Which Treatement Is Best For Kidney Failure: किडनी फेल्युअरवरील सर्वोत्तम उपचार व तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा

Kidney Dialysis Or Kidney Transplant What Is Best: बदललेली जीवनशैली, मधुमेहाचे वाढलेले प्रमाण व त्याचा मूत्रपिंडावर (किडनी) होणारा परिणाम आदी कारणांमुळे सध्या किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णाला डायलिसिस (मशिनद्वारे रक्त शुद्धीकरण) आणि किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हे दोन पर्याय उपलब्ध असतात. यापैकी कोणता पर्याय निवडावा, हे रुग्णाच्या वैयक्तिक प्रकृती, अवयवांची उपलब्धता, इतर वैद्यकीय निकषांबरोबरच रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असले तरी प्रत्यारोपण करणे हा रुग्णाच्या दृष्टीने योग्य निर्णय असल्याची माहिती तज्ज्ञ देतात.

विभागीय (पुणे) अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात सध्या १८०० जणांना किडनी हवी आहे. दिवसेंदिवस ही यादी वाढत आहे. रक्तातील युरिया, क्रियाटीनीन यासह इतर अनावश्यक घटक लघवीद्वारे बाहेर काढण्याचे व रक्त शुद्ध करण्याचे कार्य किडनी करत असते. किडनी निकामी झाल्यास रुग्णाच्या शरीरातील रक्त हे डायलिसिस मशिनद्वारे आठवड्यातून तीन वेळा शुद्ध केले जाते. ज्यामध्ये रक्तातील विषारी द्रव्य वेगळे केले जातात.

डायलिसिस उपचार तातडीने सुरू करता येतो. ज्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शक्य नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. वयस्कर व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित पर्याय आहे. परंतु, दर आठवड्याला २ ते ३ वेळा ते करावे लागते. त्यामुळे, जीवनमानावर परिणाम होतो. दम लागणे, थकवा आणि आहारावरील निर्बंध वाढतात.

तर किडनी प्रत्यारोपणमध्ये जिवंत किंवा मेंदूमृत झालेल्या दात्या रुग्णाची निरोगी किडनी प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे रुग्णाला डायलिसिसची गरज पडत नाही व त्याचे जीवनमान सुधारते. प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास, रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. परंतु, प्रत्यारोपणासाठी दाता मिळणे कठीण असते. प्रत्यारोपणानंतर औषधे घ्यावी लागतात, या त्याच्या काही मर्यादा आहेत.

जर रुग्णाला शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि योग्य दाता उपलब्ध असेल, तर किडनी प्रत्यारोपण सर्वोत्तम उपाय आहे. मात्र, काही कारणांमुळे प्रत्यारोपण शक्य नसल्यास डायलिसिस हा पर्याय निवडावा लागतो. प्रत्येक रुग्ण वेगळा असतो, त्यामुळे किडनी विकारतज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. तरुण जलोका, मूत्रविकारतज्ज्ञ

रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनूसार प्रत्यारोपण की डायलिसिस हा पर्याय स्वीकारावा लागतो. तर, दहा टक्के रूग्ण असे असतात की त्यांचे वैद्यकीय कारणांमुळे प्रत्यारोपण होऊ शकत नाही. सध्या, मधुमेह, रक्तदाब आदी कारणांमुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. संदीप मोरखंडीकर, मूत्रविकारतज्ज्ञ

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Regulatory Technology: अमेरिकेतील रेग्युलेटरी टेक्नॉलॉजी चा झपाट्याने वाढणारा उद; भारत ह्या संधीपासून दूर तर राहत नाहीये ना?

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: शेकापच्या मेळाव्यात संजय राऊत-राज ठाकरे एकत्र

चक्क 1 रुपयांत रिचार्ज! 'या' कंपनीने दिली सुपर ऑफर; मिळणार अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा अन् बरंच काही, बघा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT