Monkeypox सकाळ
आरोग्य

तुमच्या त्वचेवर आलेल्या कांजण्या की Monkeypox? आता ओळखणं होणार सोपी

अनेकदा ही फोडं काजण्या आहेत की मंकीपॉक्स हे ओळखणं कठीण जातं. पण आता या समस्येचं निदान मिळालयं.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) या नव्या आजाराने हाहाकार माजवलाय. मंकीपॉक्स नावाचा आजार जगभरात वेगाने पसरत असून या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये कहर केलाय. या मंकीपॉक्स आजारामुळे अंगावर फोडं येतात. जी कांजण्यासारखी हुबेहूब दिसतात. अनेकदा ही फोडं काजण्या आहेत की मंकीपॉक्स हे ओळखणं कठीण जातं. पण आता या समस्येचं निदान मिळालयं. ( Now we will identify différance between chickenpox and monkeypox check here)

भारतातील एका खासगी आरोग्य उपकरण कंपनी ट्रिविट्रान हेल्थकेअरने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करणार असल्याचे सांगितले.

ट्रिविट्रानने काढलेल्या या रिअल-टाइम पीसीआर किटद्वारे कांजण्या आणि मंकीपॉक्समधील फरक स्पष्ट होणार. हे कीट चार रंगांचे हायब्रिड असणार जे अनुक्रमे ऑर्थोपॉक्स गटातील विषाणू, मंकीपॉक्स, स्मॉलपॉक्स आणि ह्युमन सेल्स संदर्भातील संक्रमित आजार ओळखतो. विशेष म्हणजे या चाचणीला केवळ एक तास लागतो.

जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली असल्याने जगाच्या चिंतेत भर पडली आहे. अशात मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) एका अधिकाऱ्याने मंकीपॉक्ससाठी या आजाराचा सामना करण्यासाठी भारत तयार असल्याचे म्हणाले. अद्याप तरी देशात मंकीपॉक्सचे एकही प्रकरण आढळले नाही.

मंकीपॉक्स हा आजार माकडांसारख्या संक्रमित जीवांपासून मानवामध्ये पसरत आहे त्यामुळे या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले आहे. मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग रोग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये याचा प्रथम शोध लागला होता तर मंकीपॉक्सची पहिली मानवी केस 1970 मध्ये नोंदवली गेली होती.

मंकीपॉक्सची लक्षणे -

शरीरावर गडद लाल पुरळ

असह्य स्नायू वेदना

तीव्र डोकेदुखी

सर्दी

निमोनिया

शारीरिक थकवा जाणवणे

उच्च ताप

शरीरावर सूज

उर्जेची कमतरता जाणवणे

लाल पुरळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT