Immune System esakal
आरोग्य

Immune System : पुरुषांची की महिलांची, कोणाची इम्यून सिस्टिम असते स्ट्राँग? जाणून घ्या सविस्तर

दीर्घ आयुष्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे.

साक्षी राऊत

Immune System : आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कधीना कधी आजारी पडतोच. मात्र वारंवार आजारी पडण्याचं कारण आता पुढे आलंय. नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार आपल्या शरीरात असलेली 'इम्यून रेझिलन्स' यंत्रणा यासाठी जबाबदार आहे.

यामुळे संसर्ग किंवा इतर रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांमध्ये ही प्रणाली मजबूत असते, त्यांच्यात रोगांशी लढण्याची क्षमता जास्त असते. दीर्घ आयुष्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे.

अभ्यासाचे मुख्य संशोधक आणि टेक्सास विद्यापीठातील मेडिसिनचे प्राध्यापक सुनील आहुजा म्हणतात – हा शोध हृदयविकार, संक्रमण, कर्करोग यांसारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी नवीन प्रभावी उपचार शोधण्यात मदत करेल. संशोधकांनी सर्व वयोगटातील 50,000 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करून हा निकाल काढला आहे.

इम्यून सिस्टिम मजबूत कशी बनवाल?

नियमित व्यायामामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी होऊ शकते. डॉ. सुनील आहुजा WebMD ला सांगतात की, इम्यून सिस्टिम ही अनुवांशिक आहे. चांगले अन्न आणि नियमित व्यायामामुळे ते अधिक प्रभावी होऊ शकते. (Immunity Booster)

व्यायाम करताना आणि व्यायाम करत नसताना घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण असे दर्शविते की जेव्हा लोक नियमित व्यायाम करतात तेव्हा ते दीर्घकाळ तुंदुरुस्त राहतात. तुम्ही व्यायाम थांबवताच, तुम्ही पुन्हा शून्यावर पोहोचता. म्हणजेच वैयक्तिक शिस्त खूप महत्त्वाची आहे.

पुरुषांमध्ये की महिलांमध्ये असते स्ट्राँग इम्यूनिटी सिस्टिम?

ही प्रणाली महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक मजबूत आहे. आपण लोकांना 4 गटांमध्ये विभागू शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि संसर्गाचा धोका कमी असतो त्यांचे आयुष्य जास्त असते. कमी प्रतिकारशक्ती असलेले आणि संक्रमणाचे उच्च दर असलेले लोक दुर्दैवाने कमी जगतात. ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त असते आणि संसर्गाचा धोका जास्त असतो त्यांचे आयुष्य मध्यम असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GTA 6 Gaming Setup Cost India : घरबसल्या 'GTA 6' खेळायचा आहे? तर खिशात हवा 'इतका' पैसा! PS5 पासून मॉनिटरपर्यंत तरुणाने सांगितला एक-एक हिशोब; व्हिडीओ तुफान व्हायरल

'पवार कुटुंब एकत्र आलं तर आनंदच; पण...' | Prithviraj Chavan on Pawar Family Politics, Sakal

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्किट हाऊसमध्ये दाखल, पुण्यातील विविध प्रशासकीय कामाचा घेणार आढावा

IND vs NZ: कोविड संपून वर्षे झाली, मग 'हा' नियम अजून का? शुभमन गिल वेलिंग्टन कसोटीत विजय हुकल्यानंतर थेट ICC वर भडकला

Mangalwedha News : निंबोणी पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा अभाव; तर तालुका पशुधन कार्यालय कुलूपबंद

SCROLL FOR NEXT