oxygen 
आरोग्य

ऑक्सिजनबद्दल आपल्याला हे माहीतच हवे!

सम्राट कदम

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. यावर उपाययोजना म्हणून ठिकठिकाणचा औद्योगिक ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वळविण्यात आला. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचाही वापर वाढत गेला. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे काय? ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नक्की कसा असावा? त्याचा उपयोग काय याचा घेतलेला हा आढावा.....

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का लागते?

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर तो मानवी फुफ्फुसावर हल्ला करतो. व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास त्याला फार काही त्रास होत नाही. पण तो अत्यवस्थ अवस्थेत (क्रिटिकल) पोचला की रूग्णालयात दाखल करण्याची गरज पडते. कोरोनाचे विषाणू फुफ्फुसातील अशा पेशींवर हल्ला करतात ज्या पेशी रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळवतात. पर्यायाने शरीराला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेरून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासते.

- वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे काय?

वातावरणात २१ टक्के ऑक्सिजन असतो. मात्र रुग्णाला बाहेरून ऑक्सिजन देण्यासाठी त्यापेक्षा अधिक घनता असलेल्या ऑक्सिजनची गरज असते. रुग्णाच्या फुफ्फुसाच्या क्षमतेनुसार ऑक्सिजनची घनता ठरते. द्रव वैद्यकीय ऑक्सिजन मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून शुद्ध स्वरूपाचा ऑक्सिजन मिळवून साठविलेले असतो. त्याची शुद्धता तब्बल ९९.९९ टक्क्यांपर्यंत असते. सिलिंडरमध्ये भरण्यासाठी हा ऑक्सिजन द्रव स्वरूपात उपलब्ध केलेला असतो.

- ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय?

हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने साठविण्याचे सयंत्र म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. यामध्ये हवेतील नायट्रोजन बाजूला करून ऑक्सिजनची घनता वाढवली जाते. ऑक्सिजनचे वेगवेगळे प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन करणारे संयंत्र बाजारात उपलब्ध आहेत. सुमारे ९० ते ९४ टक्के घनता असलेला या द्वारे मिळतो. विजेवर चालणारे हे यंत्र सातत्याने हवेतून ऑक्सिजन मिळवून देते. त्याला सिलिंडर सारखे पुन्हा ऑक्सिजन भरण्याची गरज नाही.

- कोणत्या रूग्णाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज पडते?

कोरोना बाधित ‘मॉडरेट’ रूग्ण ज्याची ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज पाच लिटर प्रती मिनिटांची आहे. त्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज असल्यास थेट लिक्विड मेडीकल ऑक्सिजन सिलिंडर किंवा आयसीयुत दाखल करणे गरजेचे आहे.

- ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेताना काय पहाल?

आपल्याला प्रति मिनिटाला किती लिटर ऑक्सिजनची गरज आहे. तसेच त्याची शुद्धता किती अपेक्षीत आहे, त्यानुसार कॉन्सन्ट्रेटर खरेदी करा. त्याला ऊर्जा किती लागते, त्याचा आवाज किती होतो आदी छोटे मोठे पॅरामिटर आणि सर्टिफिकेशन जरूर पहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT