children
children esakal
आरोग्य

ओमिक्रॉनमुळे मुलं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय का?

सकाळ डिजिटल टीम

भारतामध्ये (India) १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण(Children Vaccination) मोहीम सुरू केले असली तरी पालकांची (Parents) चिंता अजून मिटलेली नाही. ओमीक्रानच्या (Omicron) लाटेदरम्यान, सर्व देशांमधील मुलांचे हॉस्पिलमध्ये दाखल(Hospitalizations of Children) होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीला (Covid 19 pandemic) सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युएसमध्ये(US) ५ वर्षाखालील मुलांचे कोरोना(Corona Virus) संर्सगामुळे हॉस्पिलमध्ये (HospitalP दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारने शुक्रवारी(७ जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, हा एकच वयोगट आहे जो अद्याप लसीकरणासाठी पात्र ठरलेला नाही. देशात ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या संसर्गाचा दर उच्च पातळीवर असताना दक्षिण आफ्रिकेतूनही (South Africa) असेच चित्र दिसून आले. अति-संक्रमणशील व्हेरिअंट पहिल्यांदा या देशात आढळला होता आणि आता जगभरातील वेगवेगळ्या भागात हा व्हेरिअंट पसरला आहे. (Is Omicron Wave Leading to More Hospitalizations of Children)

जरी डेल्टा प्रकारापेक्षा 'सौम्य' आजार असला तरी, ओमिक्रॉन वाढत्या संक्रमणास कारणीभूत ठरत असून आणि तो सामान्यत: अती-संक्रमणाशील आहे. अशावेळी वयस्क, प्रौढांप्रमाणे जगभरातील या वयोगटातील मुलांना अदयाप लसीकरणाचा डोस मिळालेला नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या संख्येने संक्रमित होण्याचा धोका वाढत आहे. परंतु विशिष्ट वयोगटांमध्ये या संसर्गामुळे अधिक गंभीर आजार होतो की नाही यावर चर्चा सुरू आहे आणि सदयस्थितीमध्ये स्पष्टता मिळविण्यासाठी आगामी आकडेवारी पाहणे आवश्यक आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या (Indian Academy of Pediatrics)सूत्रांनी सांगितले की, 15 वर्षांखालील 31 मुलांना दिल्लीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी नऊ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, परंतु असेही म्हटले आहे की "बहुतेक रुग्णालयात दाखल प्रकरणे(Cases) कॉमोरबिडीटी (comorbidity) असतात आणि साध्या उपचारानंतर ते लवकर बरे होतात," असे अहवालात नमूद केले आहे.

त्यापैकी आठ मुलांना मिर्गीचा (seizures)त्रास असल्याची नोंदवली गेली आणि त्यातील दोन मुलांचा रक्तदाब कमी आहे. कोविड-19 वगळता, इतरांमध्ये आधी पासून असलेले आजार आहेत.

दिल्लीच्या चाचा नेहरू बाल चिकित्सालयाच्या सूत्रांचा हवाला देऊन, सरकारी रुग्णालयातील एक प्रमुख बालरोग विशेषज्ञाने म्हटले आहे की, ''दोन वर्षांखालील दोन मुलांना कोविड -19 रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते आणि दररोज बालरोगविषयक प्रकरणे (Cases) ओपीडीमध्ये येत आहेत.''

पण, बालरुग्ण वयोगटासाठी उपचार करणार्‍या डॉक्टरांनी इंडिया टुडेला सांगितले की, “रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे तो लवकर बरा होतो. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दुसऱ्या लाटेइतकी जास्त नाही"

दरम्यान, आरोग्य अधिकारी भारतातील मुलांच्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या दरांवर लक्ष ठेवत आहेत, ओमिक्रॉन लाटेदरम्यान, काही देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या मुलांची संख्या जास्त असल्याचे काही पुरावे आहेत, असे अहवालात आधी म्हटले होते.

जरी डॉक्टरांनी बर्‍याच मुलांना अजूनही गंभीर काळजीची आवश्यकता नाही असे सांगितले असले तरी सरकारच्या माहितीनुसार, भारतीय राज्यांनी कमी तयारीच्या भीतीने फेडरल तज्ञांच्या सल्ल्यानुसार, हॉस्पिटलमधील बेडची संख्या दुप्पट केली आहे, असे मिंटच्या अहवालात सांगितले आहे.

आकडेवारीनुसार, फेडरल टास्कफोर्सने सल्ल्यानुसार 10,000 पेक्षा कमी खाटांची आवश्यकता पडेल पण तरीही भारतामध्ये 24,000 पेक्षा जास्त बालरुग्नांसाठी ICU बेड सध्या उपलब्ध केले आहेत. त्याचप्रमाणे, 27,682 नॉन-ICU बेड आवश्यकता असल्याचे सांगितले होते पण त्यापेक्षा जास्त 64,796 नॉन-ICU बेड सध्या उपलब्ध आहे.

यूएस मध्ये काय होत आहे? (Whats Happening in US)

डिसेंबरच्या मध्यापासून, अत्यंत संक्रमक असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे यूएसमध्ये प्रचंड वेगात पसरत असताना, या सर्वात लहान मुलांना हॉस्पिलटमध्ये दाखल करण्याचा दर 100,000 मागे प्रति २.५ वरून 100,000 मागे प्रति 4 वर पोहचला असून पूर्वीपेक्षा ही आकडेवारी जास्त दिसत आहे.

14 राज्यांमधील 250 हून अधिक रुग्णालयांमधून काढलेल्या सीडीसी डेटानुसार, 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दर 100,000 मागे प्रति 1 संक्रमित आहे. एकंदर "साथीच्या रोगाच्या कोणत्याही पूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत मुलांचे बालरोग रुग्णालयात दाखल होण्याचा दर सध्या जास्त आहे," वॅलेन्स्की यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, 12 ते 18 वयोगटातील फक्त 50% पेक्षा जास्त मुले आणि 5 ते 11 वयोगटातील फक्त 16% मुलांनी पूर्णपणे लसीकरण केले आहे.

लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा एकूण दर इतर कोणत्याही वयोगटाच्या तुलनेत अजूनही कमी आहे आणि सीडीसीच्या म्हणण्यानुसार, हा दर रोजच्या नवीन रुग्णालयात दाखल होण्याच्या सरासरी 5% दरापेक्षा कमी आहेत.

मंगळवारपर्यंत, COVID-19 सह रूग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या 18 वर्षांखालील रुग्णांची सरासरी संख्या 766 होती, जी दोन आठवड्यांपूर्वी नोंदवलेल्या आकडेवारीच्या दुप्पट होती.

जॉर्जियामध्ये तीव्र वाढीसह, कनेक्टिकट, टेनेसी, कॅलिफोर्निया आणि ओरेगॉन, या पाच राज्यांमध्ये सर्वात लहान मुलांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा दर उच्च आहे असे सीडीसीने सांगितले.

अशी स्थिती कशी ओळखली जाऊ शकते?

यूएसमध्ये लसीकरणासाठी पात्र नसलेल्या 4 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आणि माहितीनुसार,'' कोविड व्यतिरिक्त इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांचा समावेश आहे,'' असे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

''या वाढी अंशतः ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये झालेली वाढ, जी सर्व लोकसंख्येवर परिणाम करते आणि इतर श्वसन संक्रमणाचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते,'' असे त्यात म्हटले आहे.

लेखानुसार, डेटा इतर वयोगटातील रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गामध्ये समान वाढ दर्शवत नाही आणि फेडरल आरोग्य अधिकारी या शक्यतेवर विचार करत होते की, ''ओमिक्रॉन (omicron) लहान मुलांमध्ये जितका सौम्य असेल तितका मोठ्या मुलांमध्ये असू शकत नाही.''

''या व्हेरिअंटची लागण झालेल्या मुलांना प्रौढांच्या तुलनेत गंभीर आजारी पडण्याचा धोका अजूनही कमी असतो आणि लहान मुलांनाही पूर्वीच्या लाटेदरम्यान दाखल झालेल्या रुग्णांपेक्षा व्हेंटिलेटरची गरज कमी असेल'' असे डॉक्टरांनी सांगितले.

''या वयोगटातील लोकसंख्येमध्ये कोणतीही तीव्रता वाढल्याचे संकेत आम्हाला अद्याप दिसले नाहीत. ”सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वॅलेन्स्की यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

१ जानेवारीपूर्वी 4 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील 100,000 प्रति 4 पेक्षा जास्त मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. ही आकडेवारी एका महिन्यापूर्वी नोंदवलेल्या दरापेक्षा दुप्पट आणि गेल्या वर्षीच्या याच काळातील आकडेवारीनुसार सुमारे तिप्पट आहे.

याउलट, कोविडची लागण झालेल्या 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचा रूग्णालयात दाखल होण्याचा दर 0.6 प्रति 100,000 होता, अंदाजे समान आकडेवारी गेल्या अनेक महिन्यांत नोंदवली गेली.

या वेळी देखील, प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीचा किमान भाग हा सर्व वयोगटातील ओमिक्रॉनच्या वाढीबाबत आहे. देशात आता दररोज सरासरी 600,000 प्रकरणे(Cases) नोंदवली जात आहेत, त्यापैकी 5 पैकी 1 लहान मुलं आहे.

लसीकरण न झालेल्या मुलांचे संरक्षण कसे करावे? (How to Protect Unvaccinated Children?)

''लसीकरणास पात्र नसल्यामुळे लहान मुलांबाबत चिंता वाढत आहे, त्यामुळे लहान मुलाच्या आसपासच्या मोठ्या मुलांनी आणि प्रौढांनी त्यांच्या संरक्षणसाठी लसीकरणाचे डोस घेण्याची आवश्यकता आहे.'' असे डॉ. रोशेल वॅलेन्स्की, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या संचालक यांनी सांगितले.

अमेरिकेचे टॉप संसर्गजन्य-रोग तज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, ''ओमिक्रॉनमुळे संपूर्ण बोर्डात कमी-गंभीर रोग होत असल्याचे दिसून येते, परंतु त्याच्या अत्यंत संसर्गजन्यतेमुळे संक्रमणांची संख्या जास्त असेल याचा अर्थ असा होतो की, आणखी अनेक मुले संक्रमित होतील आणि त्यातील काही जण रुग्णालयात दाखल होतील.''

फौसी असेही म्हणाले की, ''कोविड -19 लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल अनेक मुलांमध्ये इतर आजारामुळे त्यांना व्हेरिअंटमुळे आरोग्यस्थिती आणखी गंभीर होण्याची अधिक शक्यता असते. त्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि फुफ्फुसाचे आजार यांचा समावेश होतो.''

फौसी आणि वॅलेन्स्की यांनी यावर जोर दिला आहे की, सर्वात लहान मुलांचे संरक्षण करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे इतर प्रत्येकाने लसीकरण करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT