Sleeping Hours esakal
आरोग्य

Sleeping Hours : सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर व्यायाम करणे ठरेल व्यर्थ! वाचा सविस्तर

एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की जर तुम्ही दररोज सहा तासांपेक्षा कमी झोपले तर व्यायामाचाही फायदा होणार नाही

साक्षी राऊत

Sleeping Hours : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. डॉक्टरसुद्धा आपल्याला निदान सात सातांची झोप घेण्याचा सल्ला देतात. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की जर तुम्ही दररोज सहा तासांपेक्षा कमी झोपले तर व्यायामाचाही फायदा होणार नाही. हे संशोधन द लॅन्सेट हेल्दी लाँगेव्हिटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम होतो. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) च्या संशोधकांनी हा अभ्यास केला. यावेळी संशोधकांनी 50 आणि त्याहून अधिक वयाच्या 8,958 लोकांचा समावेश केला आणि एकूण 10 वर्षे त्यांच्या रोजच्या दिनक्रमातील अॅक्टिव्हिटीचे निरीक्षण केले.

शारीरिक स्थिती खालावते

संशोधकांनी विश्लेषण केले की झोप आणि शारीरिक हालचालींच्या सवयींचा कालांतराने लोकांच्या कार्यावर कसा परिणाम होतो. संशोधन करणाऱ्या टीमला असे आढळून आले की जे लोक शारीरिकरित्या जास्त सक्रिय होते आणि कमी झोप घेत होते (सरासरी सहा तासांपेक्षा कमी) त्यांच्या शारिरीक स्थिती कमकुवत होती.

म्हणजेच, 10 वर्षांनंतर, त्यांचे शरीर शारीरिक स्थिती मंदावणाऱ्या लोकांच्या बरोबरीचे होते. हा अभ्यास मागील संशोधनाशी जोडलेला होता ज्यात प्रत्येक रात्री सहा ते आठ तास झोप घेणे हे उत्तम कार्यक्षमतेशी जोडले गेले होते.

हे संशोधन तीन गटात विभागले गेले होते -

अभ्यासादरम्यान सहभागींना अनेक प्रश्न विचारण्यात आले. जसे की आठवड्यात ते रात्री किती वेळ झोपतात. यात कमी झोपेचे (सहा तासांपेक्षा कमी), मध्यम झोपणारे (सहा ते आठ तास) आणि दीर्घकाळ झोपणारे (आठ तासांपेक्षा जास्त) अशा तीन गटांमध्ये विभागले गेले. यात्यात असे आढळून आले की ज्यांची झोप कमी झाली ते कालांतराने कमी सक्रिय होते. (Scientist)

10 वर्षांनंतर दिसणारे बदल-

संशोधकांना असे आढळून आले की जे लोक शारीरिकरित्या जास्त सक्रिय होते त्यांनी कितीही वेळ झोप घेतली तरीही त्यांची कार्यक्षमता चांगली राहिली. 10 वर्षांच्या कालावधीत बरेच बदल झाले आहेत. म्हणजेच सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने घट झाली. कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या गटात ५०-६० वर्षांच्या लोकांचा समावेश होता. (Sleep)

पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे

यावरून असे सूचित होते की शारीरिक हालचालींचे म्हणजेच एक्सरसाइझ आणि योगासनाचे फायदे मिळवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, असे UCL मधील अभ्यास लेखिका मिकाएला ब्लूमबर्ग यांनी सांगितले. आरोग्याचा विचार करताना झोप आणि शारीरिक हालचालींचा एकत्रितपणे विचार करणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT