Liver Health esakal
आरोग्य

Liver Health : कायम पायांच्या टाचा दुखतात? तुमच्या यकृतात असू शकते गडबड, ही 5 लक्षणं अजिबात करू नका इग्नोर

काही लक्षणांकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला आजारांच्या रुपात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते.

साक्षी राऊत

Liver Health : शरीराचे कुठलेही दुखणे चांगले नाहीच. पण तुमच्या शरीराच्या बाहेरील भागाच्या दुखण्याचा संबंध तुमच्या आंतरिक अवयवांशीही असू शकतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्ही काही लक्षणांकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला आजारांच्या रुपात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते.

द योगा इंस्टीट्यूट ऑफिशियलनुसार, यकृतात बिघाड झाल्यास पायाच्या टाचांचे दुखणे वाढते. तुमच्या शरीरात फॅटी लिव्हर, ब्लड सर्क्युलेशन, अशुद्ध रक्त असणे ही याच आजारांची लक्षणं आहेत. चला तर मग यकृतासंबंधित रोगांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

पायांच्या टाचांना सूज येणे

पायाच्या टाचांमध्ये सूज किंवा चालताना दुखणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत. मात्र या लक्षणांकडे टाळाटाळ केल्यास तुमच्या यकृतासाठी ते घातक ठरू शकते. द योगा इंस्टीट्यूटनुसार, जेव्हा यकृतात द्रव साचण्यास सुरुवात होते तेव्हा फॅटी लिव्हर होतो. आणि पायाच्या टाचा सुजतात.

टाचा गरम असणे

जास्त चालल्याने काही लोकांच्या टाचा गरम होतात. तर काही लोकांना बूटांमुळे टाचांमध्ये उष्णता जाणवते. मात्र हे संकेत लिव्हर माल्फंक्शनचेही असू शकतात. अर्थात यकृतात रक्ताची शुद्धता न होणे.

टाचांना खाज येणे

हे लक्षण जाणवल्यास उशीर करू नका. हार्ट फेल झाल्यास टाचांमध्ये खाज येऊ शकते. हार्ट फेल्युअर किंवा यकृतात बिघाड झाल्यास टाचांना खाज येते. (Lifestyle)

पायांची नखे फार मोठी दिसणे

पायांमध्ये निळसर दिसणाऱ्या व्हेन्सना स्पायडर व्हेन्स असे म्हणतात. या टाचांमध्ये दिसू शकतात. शरीरातील अॅस्ट्रोजन वाढण्याचे हे महत्वाचे लक्षण असू शकते. जेव्हा यकृत काम करणे बंद करते तेव्हा शरीरात अॅस्ट्रोजेन हार्मोन वाढतो. (Health)

टाचांवर डाग, धब्बे

काही लोकांच्या टाचांवर आणि पायांवर डाग, धब्बे दिसतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाहीये. यामुळे यकृताचे कार्य ठप्प पडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT