Oral Health Importance | Oral Health Tips Sakal
आरोग्य

Oral Health: मौखिक आरोग्य सांभाळा, पचनसंस्थेतील आजार टाळा

लोक शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतात, परंतु दात आणि मौखिक आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

Oral Health Tips: शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्यात येत असले तरी दात आणि मौखिक आरोग्याकडे फारसे लक्ष दिल्या जात नाही. मात्र, सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास याचा परिणाम वृद्धावस्थेत होतो. एवढेच नव्हे तर मौखिक आजारांना गंभीरतेने न घेतल्यास पचनसंस्थेचे आजार उद्‍भवू शकतात.

जोपर्यंत खूप वेदना होणार नाहीत तोपर्यंत डॉक्टरकडे जाण्यास टाळतात. हे चित्र सर्वत्र दिसून येते. मौखिक शुद्धता आणि दंत आरोग्याकडे लक्ष न दिल्यास वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. मधुमेहासह पचनसंस्थेतील दोष यांसारख्या रोगांची पहिली लक्षणे मुखामध्येच आढळून येतात. हिरड्याचे आजार असणाऱ्या मधुमेहींना आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण आणणे शक्‍य होत नाही. दात आणि हिरड्यांमध्ये काही बदल आढळून कॅन्सरची भीती असते. १५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये ४७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. आढळणाऱ्या एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ४० टक्के कॅन्सर मौखिक आहेत. त्यापैकी ९० टक्के कर्करोग तंबाखूमुळे होतात. (Maintain Oral Health, Avoid Digestive Diseases)

स्वस्थ आणि शुभ्र दातांसाठी...(Oral Health Tips)

  • दररोज सकाळी आणि रात्री किमान तीन मिनिटे दात स्वच्छ घासावेत

  • टंग क्‍लीनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ करा

  • दातांच्या फटीतील घाण हाताने किंवा टोकदार वस्तूने न काढता ‘डेंटल फ्लास’ या दोऱ्यानेच काढावी

  • तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळा

  • माउथवॉशचा वापर करावा

पालकांमध्ये गैरसमज-

दंतविषयक उत्तम सुविधा कमी खर्चात उपलब्ध असतानाही याकडे दुर्लक्ष केले जाते. लहान मुलांच्या बाबतीत गैरसमज आहेत. दुधाचे दात किडले तरी काही फरक पडणार नाही. कारणे ते पडणारच आहेत, असा गैरसमज आईवडीलांमध्ये आहे. परंतु, दुधाचे दात पडल्यानंतर येणाऱ्या नवीन दातांना किडीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

''प्रौढांनी फ्लोराईडचे १,५०० पीपीएम प्रमाण असलेले तर मुलांनी ५०० ते १००० पीपीएम प्रमाण असलेलेच टूथपेस्टच वापरावेत. मुलांनी जास्त प्रमाण असलेले टूथपेस्ट वापरल्यास व ते ब्रश करताना गिळल्यास गंभीर धोके संभवतात. एकूण रुग्णांपैकी १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त मुले उपचाराला येत नाही. त्यामुळे कीड आणि हिरड्यांचे आजार वाढले आहेत.'' असे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT