हरभऱ्यांमुळं शुगर नियंत्रण
हरभऱ्यांमुळं शुगर नियंत्रण Esakal
आरोग्य

Health Tips : हरभऱ्यांमुळं राहील Blood Sugar नियंत्रणात

Kirti Wadkar

Chana Health Benefits : डायबेटिसच्या रुग्णांना सतत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण मधुमेह असलेल्या रुग्णांना एक छोटीशी चूक काही वेळा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेहावर Diabetes अद्याप कोणताही उपचार नाही. केवळ जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहार यांच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. अनेक मधुमेही रुग्णांना शुगर Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. Marathi Health Tips And Diet for Blood sugar level control in diabetes

शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचार करणं गरजेचं असलं तरी काही घरुगुती पद्धतीने शुगर Blood Sugar कंट्रोलमध्ये ठेवणं शक्य आहे. आहारात Diet काही गोष्टींचा समावेश केल्याने शुगर नियंत्रणात राहू शकते. यापैकीच एक म्हणजे काळे चणे ज्याला महाराष्ट्रात बहुतांश भागात हरभरे black gram म्हंटलं जातं. हरभऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्व असतात. पाण्यात भिजवलेल्या हरभऱ्याचा आहारात समावेश केल्यास अनेक आजारांची समस्या दूर होवू शकते. Using Black Gram in Diabetes to control Blood Sugar Marathi Health Tips

मधुमेही रुग्णांसाठी हरभऱ्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि विटामिन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसचं यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. चण्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. Black gram nutritional benefits

हरभरे आणि हरभऱ्याचं पाणी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी हरभऱ्याचं कशाप्रकारे सेवन करणं गरजेचं आहे. त्याचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

मधुमेही रुग्णांसाठी हरभऱ्याचे फायदे-

चण्याचं म्हणजेच हरभऱ्याचं ग्लाइसेमिक इंडेक्स फक्त २८ इतका असतो. यासाठी मधुमेही रुग्णांना हऱभरे फायदेशीर ठरतात.

हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. १०० हरभऱ्यांमध्ये १७ ग्रॅम डायटरी फायबर असतं. हाय फायबर पदार्थ ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच आहारात भिजववेव्या हरभऱ्याचा समावेश करावा.

हरभऱ्यामध्ये घुलनशील म्हणजेच विरघळणारे आणि अघुलनशील असे दोन्ही प्रकारचे फायबर असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

हरभऱ्यामुळे मधुमेहच नव्हे तर यासंबधीच्या इतर समस्या म्हणजेच कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

लठ्ठपणामुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या अधिक वाढू शकतात. यासाठी नियमित मोड आलेल्या हरभऱ्याचं सेवन करून वजन नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.

डायबेटिसमध्ये खाण्याची अनेक पथ्य पाळावी लागतात. मात्र तुम्ही अगदी साध्या पद्धतीने हरभऱ्याचं सेवन करू शकता.

चनाचाट- तुम्ही आहारात चनाचाटचा समावेश करू शकता. यासाठी मोड आलेले म्हणजेच अंकुरित हरभरे शिजवून घ्यावे. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची टाकाळी. चवीपुरती मीठ टाकून तुम्ही हे चाट खावू शकता.

भाजलेले हरभरे- तुम्ही अंकुरित हरभरे तव्यावर भाजूनही खावू शकता.भाजलेल्या चण्यांवर लिंबू पिळून मीठ टाकून तुम्ही ते खावू शकता.

चना टिक्की- शिजवलेल्या हरभऱ्यांसोबत कोथिंबीर, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मीठ मिक्सरला भरड वाटून घ्याव. या मिश्रणाच्या चपट्या वड्या करून त्या तव्यावर कमी तेलात परतून घ्या. या चन्ना टिक्की मधुमेही रुग्ण आहारात सामील करू शकतात.

हे देखिल वाचा-

हरभऱ्याचं सेवन कधी करावं

मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळी नाश्त्यामध्ये हरभऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळचा नाश्ता करणं गरजेचं असतं. जास्त वेळ उपाशी राहिल्यास शुगर वाढण्याची शक्यता असते.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हरभऱ्यांसोबतच हरभऱ्याचं पाणी देखील उपयुक्त असत. यासाठी रात्रभर हरभरे भिजत हालावे. सकाळी हे पाणी पिणं आरोग्यासाठी लाभदायक असत. त्याचप्रमाणे हरभरे उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी पिणं देखील आरोग्यासाठी लाभदायक असतं.

आयुर्वेदानुसार काळे हरभरे वात, पित्त आणि कफ हे तीन दोषांचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT