आरोग्य

लवकर निदान, त्वरित उपचार हीच कोरोनावर मात करण्याची गुरुकिल्ली

गर्भवतींना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो म्हणून त्यांनी घराबाहेर पडणे टाळलेच पाहिजे

देविदास वाणी

जळगाव : कोरोना महामारीमुळे सर्वत्र भयाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात (corona) महिलांनी (women) औषधांवर अवलंबून न राहता औषध उपचारांसोबतच नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा. त्यामुळे सुरक्षित गर्भधारणा (pregnancy) राहण्यास मदत होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे (Dr. Sanjay Bansode) यांनी दिली.

(corona period measures protect women pregnancy)

गर्भवती महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना जंतू प्रादुर्भावापासून सुरक्षेसाठी जास्त काळजी घ्यावी लागते. गर्भवतींना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो म्हणून त्यांनी घराबाहेर पडणे टाळलेच पाहिजे. बाहेर जावे लागले तर दरवाजाचे हॅन्डल, जिने, कठडे व इतर वस्तूंना स्पर्श करणे टाळावे. आपल्या नाका-तोंडाचा स्पर्श टाळावा. मास्क कायम व योग्य पद्धतीने घातलेला असायला हवा. सॅनिटायझर व साबणाचा वापर करीत हात वारंवार स्वच्छ केले पाहिजे. गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता भरपूर फळे खाल्ली पाहिजे. संत्री, मोसंबी, अननस, लिंबू पाणी (शक्यतो कोमट पाण्यात टाकूण) ही सी जीवनसत्वाची, तर आता उन्हाळ्यामुळे टरबूज, डांगर अशी फळे शरीरातील पाणी वाढविण्यासाठी खाल्ली पाहिजे. आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूध, अंडी, केळी, मोड आलेले कडधान्य, गूळ-शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू यांचा समावेश करावा. बदाम, खारीक, मनुके समावेश केले तर उत्तमच.

नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवा
रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लोहच्या गोळ्या योग्य प्रमाणात घ्याव्या. कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमिन, antioxidant गोळ्या घेणे क्रमप्राप्त आहे. श्वसन मार्गातील संसर्गापासून रक्षण यामुळे होते. गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग झाल्यास कोरोनाची औषधे देता येत नाही. त्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वरील बाबींवर भर दिला पाहिजे. पोट दुखणे, बाळाच्या हालचाली मंदावणे, अंगावरून रक्त किंवा पाणी जाणे, तीव्र डोकेदुखी जाणवणे अशी लक्षणे जाणवत असतील तर कोरोनाच्या भीतीमुळे घरी बसू नका. त्वरित डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या. गर्भाला काही धोका अथवा व्यंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. ही काळजी पहिल्या तीन महिन्यांमध्ये अधिक घ्यायला हवी.

प्रसूतीपूर्व कोरोना तपासणी करावी
गर्भवतींची पचनक्रिया, चयापचय क्रिया बदललेली असते. त्यामुळे औषधांचे परिणाम इतरांपेक्षा वेगळे असतात. सातव्या महिन्यांनंतर गर्भवती महिलेच्या फुफ्फुसांवर दाब असतो, कार्यक्षमता कमी असते. त्यामुळे संसर्ग झाल्यास व्हेंटिलेटर लावणे गुंतागुंतीचे ठरते. प्रसूतीपूर्व अथवा सीझरियनपूर्व कोरोना तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्यानुसार आई व नवजात शिशूवर उपचार करता येतील. कोरोनाबाधित गर्भवती महिलेला प्रसूतीनंतर बाळाला घेता येत नाही, मात्र योग्य काळजी घेऊन स्तनपान सुरू करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT