वॉशिंग्टन : कर्करोगावर वेळेत निदान होणं आणि तातडीनं उपचार सुरु होण्यासाठी एक नवी चाचणी विकसित झाली आहे. यामुळं कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ एका रक्त चाचणीद्वारे (ब्लड टेस्ट) कर्करोगाची कुठलीही लक्षण दिसत नसताना या आजाराचं निदान होऊ शकणार आहे. अमेरिकेत या चाचणीवर संशोधन झालं आहे. (New blood test detects multiple cancers without symptoms)
द गार्डियनमधील वृत्तानुसार, मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन (MCED) असं या स्क्रिनिंग नाव आहे. ग्रेल (GRAIL) कंपनीनं यावर संशोधन केलं असून यामध्ये ५० आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ६,६०० हून अधिक लोकांच्या रक्तचाचण्या करण्यात आल्या. यानंतर विविध आजारांचे डझनभर नवे प्रकार समोर आले. ही चाचणी ५० वर्षांवरील लोकांमध्येच यासाठी घेण्यात आली कारण या वयोगटातील लोकांमध्येच कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. यामध्ये अनेक कर्करोग हे प्राथमिक अवस्थेत होते, ज्यांचा खुलासा या चाचणीत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या चाचणीचा अहवाल नंतर पॅरिसमधील युरोपिअन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ESMO) काँग्रेस २०२२ मध्ये सादर करण्यात आला. दरम्यान, या चाचणीचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आल्याचं पहिल्यांदाचं घडलं आहे. या रक्त चाचणीमुळं भविष्यात कर्करोगाचं निदान सहजपणे होऊ शकेल, असंही संशोधकानं म्हटलं आहे. या चाचणीतून ९२ रुग्णांमध्ये कर्करोगाचं निदान झालं.
ग्रेलनं यावर खुलासा करताना म्हटलं की, ज्यांची कोणतीही कर्करोगाची चाचणी झाली नव्हती अशा लोकांमध्ये कर्करोगाचं निदान झालं, ज्यामध्ये ७१ टक्के लोकांमध्ये कर्करोगाचे विविध प्रकार आढळले. यामुळं आता या नव्या चाचणीतून कर्करोगाच्या चाचणीत आणखी वाढ होण्याची आशा आहे. यामुळं चांगल्यात चांगली उपचार पद्धती तयार होण्याचीही शक्यता निर्माण होईल, अशी आशाही कंपनीनं व्यक्त केली आहे.
ग्रेलचे प्रमुख मेडिकल अधिकारी जेफ्री वेनस्ट्रॉम यांनी म्हटलं की, "MCED कर्करोगाच्या स्क्रिनिंगमुळं सर्वाधिक कर्करोग पीडित समोर आले आहेत. या पीडितांमध्ये छोट्या लिव्हरचा कर्करोग, छोट्या आतड्यांचा कर्करोग, गर्भाशयाच्या स्टेज १ चा कर्करोग तसेच स्टेज २ चा अंडाशयाचा कर्करोग, हाडांचा कर्करोग तसेच ऑरिफरिन्जिअल यांसारख्ये कर्करोग आढळून आले आहेत. या अभ्यासातून ११ भिन्न प्रकारच्या कर्करोगांची माहिती मिळाली, ज्यांची आजपर्यंत कोणतीही निश्चित चाचणी उपलब्ध नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.