Epilepsy Disease google
आरोग्य

Epilepsy Disease : अचानक येऊ शकतो मेंदूचा झटका; या आजारावर उपाय काय ?

चक्कर आल्यानंतर पडल्यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते. त्याशिवाय, इतर गुंतागुंत म्हणजे नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो.

नमिता धुरी

मुंबई : एपिलेप्सी (अपस्मार) हा एक मेंदूचा आजार आहे ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. वेळीच हस्तक्षेप करून या परिस्थितीचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.

जनजागृतीच्या अभावामुळे याबाबत अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत. सर्व वयोगटातील लोकांना या स्थितीचा त्रास होऊ शकतो. ( Epilepsy Disease )

अपस्माराच्या लक्षणांमध्ये शुध्द हरपणे, स्नायुंचा ताठरपणा, अचानक कोसळणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे,ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे, भिती वाटणे आदींचा समावेश आहे.

काही लोकांना झटका आलेल्या काळात काय घडले तेदेखील आठवत नाही. या आजाराचे कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल सांगत आहेत एसआरव्ही रुग्णालयाच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कविता बऱ्हाटे. हेही वाचा - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

कारणे

मेंदूला झालेली दुखापत, गंभीर आजार, ताप, पक्षाघात, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, मेंदूतील गाठ, स्मृतिभ्रंश, एचआयव्ही आणि एड्स आणि मेंदूज्वर, मादक पदार्थांचे सेवन आणि अल्कोहोलचे अतिसेवन ही या स्थितीमागील काही कारणे आहेत.

शिवाय झोप न लागणे, आजारपण, ताप, तणाव, विशिष्ट औषधांचे सेवन, जेवण टाळणे किंवा अति खाणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यामुळे ही स्थिती उद्भवते. वेळीच लक्षणे ओळखून विलंब न करता त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे.

चक्कर आल्यानंतर पडल्यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते. त्याशिवाय, इतर गुंतागुंत म्हणजे नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो.

अशा प्रकारे, जेव्हा तुम्हाला ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणारा झटका येतो किंवा तुम्हाला गंभीर दुखापत किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निदान कसे होते ?

फेफरे येण्याच्या कारणांचे निदान करण्यासाठी डॉक्टर एमआरआय आणि ईईजी करण्याचा सल्ला देतात. परंतु अपस्माराचे निदान हे क्लिनिकल असते. या चाचण्या डॉक्टरांना रुग्णाच्या मेंदूच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करण्यास आणि त्याचे निदान करण्यासाठी त्याच्या मेंदूचे पुनरावलोकन करण्यास साहाय्यक ठरतात.

प्रतिबंध कसा कराल ?

अपस्मारासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे नक्कीच फायदेशीर ठरेल. निरोगी राहाण्यासाठी आणि मेंदूचे झटके नियंत्रित करण्यासाठी दररोज व्यायाम करा.

व्यायाम केल्याने तुम्हाला तणाव कमी करण्यात आणि तुमचा मूड सुधारण्यास देखील मदत होऊ शकते. तसेच, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांमुळे तणाव कमी होतो. चांगली झोप, पुरेसे वजन राखणे आणि धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT